Crime Sakal
पुणे

कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांची सुटका; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकलूज रस्त्यावर गस्तीदरम्यान प्राण्यांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनावर थेट कारवाई करून १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर पोलिसांनी दि. १६ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता तालुक्यातील बावडा दूरक्षेत्र हद्दीत अकलूज रस्त्यावर गस्तीदरम्यान प्राण्यांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनावर थेट कारवाई करून १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात पोलिस नाईक अमोल गायकवाड यांच्या फिर्यादी वरून शहबाज़ आयुब कुरेशी ( वय २५ रा. कुरेशी गल्ली, इंदापूर ) व लेलँड गाडी नंबर एमएच ४२ ए क्यु ३६३८ या वाहनावरील पळून गेलेल्या अज्ञातचालका विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे नोंदविण्यात (Case File) आले. पैकी शहबाज कुरेशी यास अटक करण्यात आली. (Pune Crime News)

यातील आरोपी १ व २ यांनी त्यांच्या ताब्या तील दोन्ही वाहनात जनावरे कत्तलकरण्याच्या उद्देशाने त्यांना चारा-पाण्याची सोय न करता दाटीवाटीने बांधून निर्दयपणे वाहतूक करत असताना आढळून आले. यावेळी ४५ हजार रुपये किमतीची काळ्या पांढऱ्या रंगाची जर्सी जातीची गाय, ६० हजार रुपये किमतीच्या चार मोठ्या खिलार देशी गाई, प्रत्येकी ८ लाख रुपये किमतीचे एक महिंद्रा कंपनीचे पिकअप ( क्र. एमएच ११ एजी ४५३५ ) व अशोक लेलंड गाडी ( क्र. एमएच ४२ ए क्यु ३६३८) असा एकूण १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातआला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे व महेश माने,पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक फौजदार सतीश ढवळे व श्री. काझी, पोलीस शिपाई रोहित यादव, होमगार्ड सूरज पोटफोडे या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेची कुणावर नजर? 'त्या' देशाचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, पुन्हा तणाव वाढणार!

Latest Marathi Live Updates: नागपुरातील विद्यार्थ्याला बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

SCROLL FOR NEXT