crime police action aghori pooja incident of pune discussed in state-assembly sakal
पुणे

Pune News : जादूटोण्यासाठी मासिक पाळीच्या रक्ताची विक्री; महिलेच्या छळाविरुद्ध सासरच्यांवर गुन्हा दाखल

‘अघोरी पूजे’च्या घटनेनंतर दुसरा प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी ‘अघोरी पूजे’च्या नावाखाली मानवाच्या हाडांची पावडर सेवन करण्यास भाग पाडल्याची घटना शहरात जानेवारीमध्ये घडली होती. या घटनेचे पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले असतानाच पुन्हा एका महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मासिक पाळी सुरू असताना एका महिलेशी अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात एका २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि भाचा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

विवाहानंतर ही महिला बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. २६ जून २०१९ पासून तिचा पतीसह नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. मासिक पाळीदरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले. या छळास कंटाळून ती माहेरी आली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करीत आहेत.

‘अघोरी पूजे’चे विधिमंडळात पडसाद

शहरात जानेवारी महिन्यात एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी ‘अघोरी पूजे’च्या नावाखाली मानवाच्या हाडांची पावडरचे सेवन करण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणाची विधिमंडळात दखल घेण्यात आली. याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. दरम्यान, पुन्हा एका महिलेसोबत अघोरी प्रकार घडल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Zika Virus: पुण्याला ‘झिका’चा धोका कायम! विषाणूच्या जनुकीय संरचनेतही आढळले बदल; ‘एनआयव्‍ही’च्‍या शास्‍त्रज्ञांचा शोध

Sunetra Pawar: दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धीर; पाणी, चारा, शिक्षणासाठीही मदत

IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT