Crowd of devotees for darshan of Ganapati 
पुणे

कोरोनाच्या सावटातही भाविकांची गर्दी; गणपतींच्या दर्शनासाठी नागरिक रस्त्यावर

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या उद्रेकाच्या भीतीने घरातूनच श्रींचे मनोमन दर्शन करण्यास यंदा पुणेकरांनी प्राधान्य दिले. पण उत्सवातील शेवटच्या रविवारचा मुहूर्त गाठत मध्य वस्तीतील मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दित्र दिसून आले.

पावसाची रिमझिम... सनईचे मंगल स्वर... धुपाच्या सुंगध... अशा वातावरणात मास्क लावून आणि सॅनिटाझरचा वापर करत तरुण रस्त्यावर फिरत होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गणेशोत्सवात गर्दी करू नका, असे आवाहन केले जात आहे. त्यास पुणेकारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला. पण जसा गणेशोत्सव शेवटच्या टप्प्यात येत आहे, तशी गर्दी वाढत आहे. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पहाटेपासून पुणेकर दर्शनसाठी बाहेर पडले. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे रस्त्यावरील गर्दी कमी होत होती. पण पाऊस उघडला की लोक पुन्हा रस्त्यावर येत होते. सायंकाळनंतर मध्यवस्तीमध्ये गर्दी वाढली, त्यावेळी एकमेकांना स्पर्श होऊ नये, यासाठी अंग चोरून चालण्याची वेळ नागरिकांवर  आली.

ग्राम दैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीचे दर्शन घेऊन तरुणांचा लोंढा शिवाजी रस्त्याने पुढे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पुढे सरकत होता. यंदा या रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरू ठेवली. पण त्याच वेळी गणपतीच्या दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रांग केली आहे. रस्त्यावर वाहनांव्यतिक्त पादचारी येणार नाही, हे सुद्धा पाहिले जात होते. पादचाऱ्यांना सक्तीने मंदिराच्या समोरच्या पदपथावरून चालावे लागले. त्यामुळे वाहनांना पादचाऱ्यांना अडथळा होत नव्हता.

‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, तिसरा गणपती गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग गणपतीचे दर्शन करून ही तरुणाई मंडई गणपतीच्या दर्शनासाठी वळत होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अशक्‍य झाले होते. गणपतीची आरती सुरू झाल्यानंतर शेकडो भाविक गर्दी करून एकाच ठिकाणी थांबून असल्याचे तांबडी जोगेश्‍वरी मंडळा समोर दिसून आले. तरुण-तरुणी, सहकुटुंब आलेले भाविक भर रस्त्यात सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे चित्र मध्यवस्तीत बघायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT