bhor
bhor 
पुणे

भोरच्या प्रशासनला आता कडक पाऊल उचलावेच लागणार

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असली, तरीही नागरिकांना व व्यावसायिकांना त्याचे गांभीर्य दिसून येत नाही. प्रशासनाच्या सोशल डिस्टनसिंग आणि दुकानांच्या वेळेच्या नियमांना हारताळ फासून शहरात दिवसभर तुंडुंब गर्दी सुरु आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर सोमवारी (ता. १०) सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी झाली. पोलिस आल्यानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली, परंतु काही मिनिटानंतर पुन्हा वाहतूक कोंडी सुरु झाली. 

भोर शहरातील दुकाने प्रशासनाने १ जुलैपासून सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत उघडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही 
कित्येक दुकाने ही सायंकाळपर्यंत उघडी राहत असून, नागरिकांची संख्याही कमी होत नाही. एकीकडे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. मात्र, शहरात नागरिकांची गर्दी मात्र कमी होत नाही. नगरपालिकेच्या गस्त पथकामार्फत मोटारीतून जनजागृती करून कारवाई करण्यात येत आहे.  

भोर परिसरात रविवारपासून (ता. ९) पावसाने काही प्रमाणात विश्रांती दिल्याने सोमवारी शहरात खूप गर्दी होती. शेतीच्या मशागतीसाठी लागणारे अवजारे, खते व इतर साहित्याच्या खरेदीसाठी खेडेगावांमधील शेतकरी भोर शहरात आले होते. पैसे काढण्यासाठी बँकांमध्येही तुफान गर्दी होती. शहरातील मुख्य मंगळवार पेठ, नवी आळी आणि राजवाडा चौकात अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा झाला. पेठेतील दुकानदारांनी विक्रीसाठी रस्त्यावर माल ठेवल्यामुळे आणि त्यापुढे दुचाकी पार्किंग केल्यामुळे वीस फुटांचा रस्ता फक्त दहा फुटांचा शिल्लक राहिला. त्यामुळे मोटारी जाण्यासाठी अनेकांमध्ये वादही झाले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली दोन वार्डन नेमले आहेत. मात्र, ते समस्या सोडवू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
    
भोर शहरात आजपर्यंत ३९ जण कोरोनाग्रस्त आढळले असून, दोघांचा मृत्यू झालेला आहे. २६ जण कोरोनाच्या आजारावर मात करून घरी गेले आहेत, तर १३ जणांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि नागरिक याबाबत कोणतेही गांभीर्य घेत नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजास्तव प्रशासनास पुन्हा एकदा लॉकडाउनचा विचार करावा लागणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT