stone112.jpg 
पुणे

पुण्यात 50 दिवसांपासून बंद असलेली क्रशर व खाणींची खडखड सुरू

नीलेश कांकरिया

वाघोली (पुणे) :  भावडी,  लोणीकंद,  फुलगाव, वाघोली येथील क्रशर व खाणीचा खडखड सुरू झाला आहे. सुमारे 110 खाणी व 70 क्रशर या भागात आहेत. प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांनी यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रदीप कंद व उद्योजक बाळासाहेब सातव यांनी दिली.

50 दिवसापासून ही खडखड बंद होती. बांधकामे, मेट्रो, रस्त्यांची कामे व इतर कामे सुरू झाल्याने त्यासाठी खडी, क्रश सँड पुरवठा गरजेचा होता. क्रशर व खाण मालकांचाही उद्योग सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू होता. आजपासून काही खाणी व क्रशर सुरू करण्यात आले आहे. या क्षेत्रातही परप्रांतीय मजूर काम करीत होते. मात्र, ते परतल्याने त्यांचा तुटवडा काही प्रमाणात जाणवणार आहे.

सकाळी सात ते रात्री सात पर्यंत ही खड खड सुरू राहणार आहे. ही खडखड सुरू झाल्याने हजारो कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार आहे. आमदार अशोक पवार, प्रदीप कंद, रामदास दाभाडे व अन्य उद्योजकांनी यासाठी पाठपुरवठा केला. खडी व क्रश सँडची मागणी सध्या कमी असल्याने सर्वच उद्योजक खाणी सुरू करतील असे नाही. मागणी वाढल्यानंतर सर्व खाण व क्रशर सुरू होतील असे उद्योजक संतोष देशमुख यांनी सांगितले.


वाघोली परिसरातील खाण उद्योग क्षेत्राची स्थिती

  1. सुमारे 110 खाणी
  2. सुमारे 70 क्रशर
  3. एकूण कामगार सुमारे -- 4000
  4. या क्षेत्रावर अवलंबून असणारे इतर छोटे व्यासायिक सुमारे  -- 2000 ( ट्रॅक्टर, कॉम्प्रेसर, जेसीबी, पोकलांड, डंपर मालक आदी )
  5. दररोजचे एकूण उत्पादन -- 700 ब्रास
  6. 50 दिवसातील नुकसान -- सुमारे 70 ते 80 कोटी
     

शासनाला मिळेल महसूल
खाण उद्योगातून कोट्यवधींचा महसूल सरकारला मिळतो. लॉक डाऊनमुळे हे क्षेत्रही बंद असल्याने हा महसूल थांबला होता. आता तो पुन्हा मिळेल.

बांधकामे व अन्य कामे सुरू झाल्याने खडी, क्रश सँडचा पुरवठा गरजेचा होता. यासाठी आमचाही पाठपुरवठा सुरू होता. जिल्हाधिकारी यांनी त्याला परवानगी दिली असून सर्व नियमांचे पालन करून खाणी व क्रशर सुरू झाले आहेत.

-प्रदीप कंद, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ.
 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा

हे क्षेत्र सुरू झाल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांना रोजगार मिळेल. मालाचा पुरवठा झाल्याने कामेही मार्गी लागतील. 

- अशोक पवार, आमदार, शिरूर हवेली.  


 मालाला लगेच तेवढी मागणी नसल्याने उत्पादनही कमी असेल. मात्र 50 दिवस थांबलेले अर्थ चक्र सुरू होईल.

- रामदास दाभाडे, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT