ncp 
पुणे

शिरूरचे राजकारण नवीन वळणावर, निर्णय घेण्यासाठी नेत्यांची कसोटी  

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व उपसभापती विश्‍वास ढमढेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याची उत्कंठा तालुक्‍यात आहे. या पदांसाठी अनेक दिग्गज संचालक सरसावले असून, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

शिरूर बाजार समितीच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 18 पैकी राष्ट्रवादी कांग्रेसला 13 व भाजपला पाच जागा मिळाल्या. त्यानंतर तृप्ती भरणे व विकास शिवले यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे सध्या 15 संचालक आहेत. शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेली असल्याने व तेथील पाच संचालक असल्याने सभापती, उपसभापती निवडीत शिरूर- आंबेगाव, असा विभागीय समतोल राखण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. 

दसगुडे व ढमढेरे यांच्या निवडीवेळी आमदार अशोक पवार यांनी राजकीय कौशल्य वापरून दोन्ही पदे शिरूर भागातच ठेवली होती. विधानसभा निवडणुकीत याचा त्यांना फायदा झाला. मात्र, दोन्ही पदे शिरूर भागालाच गेल्याने आंबेगाव भागातील प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, शंकर जांभळकर या तिघांसह शिक्रापूरचे आबाराजे मांढरे यांनी सभात्याग करून नाराजी व्यक्त केली होती. या वेळी दोन्ही पदे आंबेगावला द्यावीत, अशी सुप्त मागणीही पुढे आली असून, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे त्यादृष्टीने फिल्डिंग लावण्यात आल्याचे समजते. 

विधानसभा निवडणुकीत सर्वच संचालकांच्या गटात चांगली कामगिरी झाल्याने कोणाला संधी द्यावी, असा प्रश्‍न अशोक पवार यांच्यासमोर आहे. अधिक संचालकांच्या बळावर निर्णयांचे अधिकार त्यांच्याकडे असले; तरी वळसे पाटील यांना मानणाऱ्या संचालकांमुळे त्यांचे मतही विचारात घ्यावे लागणार आहे. 

मांढरे, जांभळकर यांची नावे चर्चेत 
सभापतिपदासाठी आबाराजे मांढरे व शंकर जांभळकर यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. एकाला संधी मिळाल्यास विभागीय समतोल म्हणून दुसऱ्याला उपसभापतिपद मिळू शकते. मांढरे हे आमदार पवार यांचे; तर जांभळकर हे वळसे पाटील यांचे समर्थक आहेत. गतवेळी तीव्र इच्छुक असलेले मानसिंग पाचुंदकर यांनी काही खेळी केल्यास किंवा प्रकाश पवार यांनी तलवार उपसल्यास निवडीचे चित्र बदलू शकते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना

Bride Theft Case : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू भावोजीसोबत फरार, पोलीस तपासात खळबळजनक सत्य उघड; पतीसह कुटुंबाला मोठा धक्का !

Latest Marathi News Update : यवतमाळात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; 0 ते 5 वर्षांतील 2 लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

Samruddhi Road Accident : चिमुरडीचं हसू कायमचं हरपलं! समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

SCROLL FOR NEXT