the cut-off is beyond ninety even in the second round of Famous colleges 
पुणे

पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयांचा दुसऱ्या फेरीतही कट-ऑफ नव्वदीपारच 

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील नामाकिंत महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या गुणवत्ता यादीतील कट-ऑफमध्ये केवळ काही गुणांचा (पॉईट) फरक असल्याचे निदर्शनास येत आहे. नामाकिंत महाविद्यालयांमधील पहिल्या आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीतील कट ऑफ अवघ्या काही 'पॉईट'ने कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दुसऱ्या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस कायम होती.

अकरावी प्रवेश प्रक्रियेतंर्गत यंदा पहिल्या यादीपासूनच कट ऑफमध्ये सरासरी तब्बल चार ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ असल्याचे दिसून येते. हेच चित्र दुसऱ्या फेरीतही कायम होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसह सीबीएसई, आयसीएसई अशा विविध मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात एकूणच यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ वाढणार हे यापुर्वीच स्पष्ट झाले होते.

यंदा कट-ऑफ वाढल्यामुळे नामाकिंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमधील चुरस दुसऱ्या फेरीतही कायम असल्याचे चित्र आहे. 
 

नामाकिंत महाविद्यालयातील पहिल्या-दुसऱ्या फेरीतील चित्र 
फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेचा पहिल्या फेरीत कट ऑफ 97.4 टक्के इतका, तर दुसऱ्या फेरीत 96.40 टक्के इतका आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील प्रवेशाचा पहिल्या फेरीत 92.60टक्के कट ऑफ होता, तर दुसऱ्या फेरीत तो केवळ काही पॉईंटने कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. या फेरीत वाणिज्य शाखेचा कट ऑफ 92.40 टक्के इतका आहे. सिंबायोसिस महाविद्यालयाचा पहिल्या फेरीत कला शाखेचा कट ऑफ 96.60 टक्के, तर वाणिज्य शाखेचा कट ऑफ 94.2 टक्के आहे. दुसऱ्या फेरीत कट ऑफ काही पॉईंटने कमी झाल्याचे दिसून येते. या महाविद्यालयात दुसऱ्या फेरीत कला शाखेचा 96.20 टक्के तर वाणिज्य शाखेचा 93.40 टक्के इतका कट ऑफ आहे. 


"दहावीच्या एकूण निकालाची टक्केवारी यंदा वाढला असल्या पहिल्या गुणवत्ता यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पहायला मिळत आहे. दोन्ही याद्यांमधील कट ऑफमध्ये अवघ्या काही गुणांचा फरक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील कट ऑफमध्ये एक ते दोन टक्‍क्‍यांचा फरक असल्याचे निदर्शनास येते.'' 
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर) 

बाईकची हौस नडली; बनावट कागदपत्रासह दुसऱ्याच्या नावे कर्ज घेणं पडलं महागात

शहरातील नामाकिंत महाविद्यालयाचा दुसऱ्या फेरीतील कट-ऑफ (टक्केवारीत) : 
महाविद्यालयाचे नाव : शाखा : कट-ऑफ (टक्केवारीत) 
फर्ग्युसन महाविद्यालय : विज्ञान : 96.40 टक्के 
सिंबायोसिस महाविद्यालय : कला : 96.20 टक्के 
सिंबायोसिस महाविद्यालय : वाणिज्य : 93.40 टक्के 
आबासाहेब गरवारे महाविद्यालय : कला : 67.20 टक्के 
आबासाहेब गरवारे महाविद्यालय : वाणिज्य : 93.80 टक्के 
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : कला : 83 टक्के 
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : वाणिज्य : 92.40 टक्के 
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : विज्ञान : 93.20 टक्के 
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : कला : 93.40 टक्के 
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : 88.40 टक्के 
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 94 टक्के 
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : कला : 66.20 टक्के 
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : वाणिज्य : 87.80 टक्के 
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : विज्ञान : 92.40 टक्के 
नेस वाडिया महाविद्यालय : वाणिज्य : 72.20 टक्के 
सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : 82.80 टक्के 
सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : 92.60 टक्के

नोकरी गेलीय, उत्पन्न घटलंय? चिंता नको!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT