bycycle
bycycle 
पुणे

आंबेगाव- शिर्डी सायकल फेरीतून प्रदूषणमुक्तीचा संदेश 

नवनाथ भेके

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील "अँबी सायकल ग्रुप'ने रविवारी (ता. 8) सायकलद्वारे 142 किलोमीटरचा शिर्डी प्रवास करत "सायकल चालवा, निरोगी राहा' आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश दिला. 

डॉ. शिवाजी थिटे यांच्या प्रेरणेतून आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर, अवसरी बुद्रूक व पारगाव येथील डॉक्‍टर, व्यावसायिक व शिक्षकांनी एकत्र येत अडीच वर्षांपूर्वी अँबी सायकल ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपमधील सर्व सदस्य दररोज सकाळी 18 किलोमीटर सायकल प्रवास करतात. त्यांनी आतापर्यंत गोवा (600 किलोमीटर), भीमाशंकर दोन्ही बाजूंनी (180 किलोमीटर), पंढरपूर (234 किलोमीटर) व रविवारी शिर्डीचा एक दिवसात 142 किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

शिर्डीच्या प्रवासासाठी पारगावपासून सुरुवात करत निरगुडसर, अवसरी, मंचर, नारायणगाव, संगमनेरमार्गे ते शिर्डीला पोचले. प्रवासादरम्यान ठिकठिकाणचे नागरिक त्यांना चहा व नाष्ट्यासाठी विचारत होते. संगमनेर येथे डॉ. गुलाब गोसावी व त्यांच्या कुटुंबीयांनी पाहुणचार करत या ग्रुपचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. 
या ग्रुपमध्ये डॉ. शिवाजी थिटे, डॉ. गणेश बढेकर, प्रमोद हिंगे, रामदास मिंडे, सचिन देवडे, शशिकांत लोखंडे, श्‍याम टाव्हरे, विजय वळसे पाटील, भाऊ चिखले, सुहास चौधरी, अविनाश ढोबळे यांचा सहभाग होता. 

देशभरात प्रवास करणार 
"अँबी सायकल ग्रुप' दरवर्षी देशाच्या विविध भागांत प्रवास करणार आहेत. या प्रवासादरम्यान सायकल चालविण्याच्या फायद्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. "सायकल चालवा, निरोगी राहा' "आपला देश प्रदूषणमुक्त बनवा,' असा संदेश देणार असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT