Vishakha_Kale 
पुणे

प्रसिद्ध नृत्यांगणेनं २१ व्या वर्षी संपवलं जीवन; पुण्यात राहत्या घरी केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नृत्यांगणा विशाखा काळे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हडपसर भागातील गोंधळेनगर परिसरात मंगळवारी (ता.६) सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अपघातानंतर आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

काळे या 21 वर्षांच्या होत्या. याप्रकरणी हडपसर पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा या नृत्य कलावंत होत्या. त्या आई-वडील आणि बहिणीसह गोंधळेनगर भागात राहत होत्या. विशाखा आणि त्यांची बहीण इव्हेंट मॅनेजमेंट आणि नृत्याचे कार्यक्रम करीत असत. विशाखा यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अपघात झाला होता. त्यात त्यांच्या चेहऱ्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. अपघाताच्या घटनेनंतर काही दिवसांपासून त्या नैराश्‍यात होत्या.

दरम्यान, विशाखा यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना आढळून आले. त्यानंतर त्वरित या घटनेची माहिती कुटुंबीयांनी हडपसर पोलिसांना दिली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण पोलिस शोधत आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून काळे लावणी सादर केली आहे. कोरोना काळात हातात कुठलंच काम नसल्याचे अनेक कलाकारांची घरची परिस्थिती हलाखीची बनली आहे. अनेक लोककलावंतांची हीच हालत असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. आतापर्यंत राज्यात ६ कलाकारांनी आत्महत्या केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT