Uddhav Thackeray Eknath Shinde Sharad Pawar Sakal
पुणे

Dasara Melava : शिंदे आणि ठाकरे दोघांनाही शरद पवारांनी खडसावलं; म्हणाले...

राज्यातलं वातावरण सुधारण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांवर आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या बंडानंतर दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून हा वाद आणखी चिघळताना दिसत आहे. या वादामध्ये राष्ट्रवादी उडी घेत असल्याची चर्चा असतानाच शरद पवारांनी आता शिंदे आणि ठाकरे दोघांनाही सुनावलं आहे. याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांविषयीही त्यांनी भाष्य केलं आहे.

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे, शिंदे दोघांनाही सुनावताना शरद पवार म्हणाले, "एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्यातले जबाबदार लोक आहे. त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत. आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आम्हा लोकांसारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल".

नुकत्याच पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतल्या जागेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा ठाकरे गटालाच असेल, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT