Bharane_Thackeray 
पुणे

शेतकऱ्यांच्या 'त्या' मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : राज्यमंत्री भरणे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी (ता.१५) सांगितले. 

राज्यमंत्री भरणे हे सोमवारी (ता.१५) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (पीडीसीसी) आले होते. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन, अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. शिवाय जिल्हा बँकेच्यावतीने  भरणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. त्यावेळी भरणे यांनी हे आश्वासन दिले. 

राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा आणि पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या घोषणेनंतर महिनाभरातच राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यामुळे तातडीने लॉकडाउन सुरू करावे लागले. परिणामी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळू शकली नाही.

याशिवाय कर्जमाफ होऊनही अनेकांच्या अंगठ्याचे ठसे न आल्याने, केवळ या तांत्रिक बाबींमुळे काही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनाही त्वरित कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला असल्याचे भरणे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT