daund jn 
पुणे

राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना चमकण्याची हौसच भारी! 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या श्रमिक एक्‍सप्रेससाठी मजुरांनी शारीरिक अंतर राखण्याचा नियम काटेकोरपणे पाळला. परंतु, मजुरांना निरोप देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शारीरिक अंतर न पाळता गर्दी केली. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने दौंड रेल्वे स्थानकावरून आज (ता. 21) कुरकुंभ एमआयडीसी व दौंड तालुक्‍यातील 1101 मजुरांना घेऊन विशेष श्रमिक एक्‍सप्रेसने उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरकडे रवाना झाली. तहसीलदार संजय पाटील, गट विकास अधिकारी गणेश मोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे व दौंड पोलिसांनी श्रमिक एक्‍सप्रेसने जाणाऱ्या मजुरांसाठी तालुक्‍यातून रेल्वे स्थानकापर्यंत खास बसगाड्यांची व्यवस्था केली होती. 

रेल्वे स्थानक परिसर ते फलाट क्रमांक सहापर्यंत शारीरिक अंतर राखण्यासाठी आखलेले चौकोन व गोल यामध्ये मजुरांना उभे करून त्यांची नोंद, वैद्यकीय तपासणी व दुबार नोंद करण्यात आली. फलाटावर देखील त्यांना रांगेत उभे करून त्यांच्या आरक्षित डब्ब्यात पाठविण्यात आले. डब्ब्यांमध्ये देखील शारीरिक अंतराचा नियम पाळला जात आहे किंवा नाही, याची रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिस पडताळणी करीत होते. मजुरांच्या जाण्याची व्यवस्था करणारे व त्यांना निरोप देण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र शारीरिक अंतर न पाळता घोळक्‍याने फलाटावर फिरत होते. रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिस मजुरांना नियम निक्षून सांगत होते, परंतु पदाधिकारी घोळक्‍याने फिरत असताना मौन बाळगून होते. 

नागरिक एक्‍सप्रेसमध्ये स्थानापन्न झाल्यानंतर तहसीलदार संजय पाटील यांनी या एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, नगरसेवक बादशहा शेख, मोहन नारंग, युवक आघाडीचे सचिन गायकवाड, सामाजिक आघाडीचे दीपक सोनवणे, आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली, मात्र तेव्हा पोलिस मूक दर्शक बनून राहिले.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT