daund police 
पुणे

दौंडमध्ये कोरोनाने ठोकलाय तळ, आणखी सात पोलिसांसह एका चिमुकलीला बाधा 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन गटांमधील सात पोलिस व शहरातील एका सात वर्षाची मुलगी, अशा एकूण आठ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. गेल्या ४८ दिवसांत पहिल्यांदाच एका सात वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे.

मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या एसआरपीएफ गट क्रमांक पाच व गट क्रमांक सातमधील पोलिसांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज (ता. १६) आला असून, गट क्रमांक सातमधील सहा व गट क्रमांक पाचमधील एक, अशा एकूण सात पोलिसांना बाधा झाली आहे. या बाधितांचे वयोमान २४ ते ५० दरम्यान आहे, अशी माहिती आज (ता. १६) दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

दौंड शहरातील मीरा सोसायटीच्या अलीकडे दत्त मंदिराजवळ दूध विक्रेत्याच्या कुटुंबातील एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास ९ जून रोजी कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांना बाधा झाली होती. आज (ता. १६) त्यांच्या कुटुंबातील एका ७ वर्षाच्या मुलीला बाधा झाल्याने एकाच कुटुंबातील बाधितांची संख्या चौदा झाली आहे.

एसआरपीएफ गट क्रमांक सातमधील एकूण ४१ पोलिसांना बाधा झालेली आहे व त्यापैकी २७ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. गट क्रमांक पाचमधील एकाही पोलिसाला आजपर्यंत बाधा झाली नव्हती, परंतु आज एका ३४ वर्षीय पोलिसाला बाधा झाली आहे. 

एसआरपीएफचे जवान हे मुंबई येथून परतल्यावर त्यांचे नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. बाधित पोलिसांना आज (ता. १६) पुढील उपचारासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती गट क्रमांक पाचचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन भोसले यांनी दिली. 

४८ दिवसांत ८९ जणांना बाधा
दौंड शहर व तालुक्यात २९ एप्रिल ते १६ जून या कालावधीत एकूण ८९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वयोमान ०७ ते ८२ या दरम्यान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT