dead body of two boys found who drowned Varasgaon dam 
पुणे

तब्बल 19 तासांच्या शोधमोहिमेनंतर सापडले मृतदेह; वरसगांव धरणात बुडाले होते विद्यार्थी

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : मोसे खोऱ्यातील लवासा पसिरातील पडळघर (ता.मुळशी) येथील वरसगांव धरणाच्या पाण्यात बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाला आज यश आले आहे. तब्बल एकोणीस तासांच्या अथक प्रयत्नांची ही कामगिरी करून निहाल उत्तम थापा ( वय २१ रा. शिलॉंग,मेघालय) आणि सीरक्षीत चंद्रमोली स्वरम ( वय २० , रा. चेन्नई ) या दोघांचे मृतदेह आज पाण्यातून बाहेर काढण्यात आले. 

हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवासा येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटी या महाविद्यालयात बीएस्सीच्या द्वितीय वर्षांत थापा व स्वरम हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. रविवारी(ता.  १४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निहाल थापा व सीरक्षीत स्वरम हे दोघेजण आणि आणखी दोन मिञ असे चौघेजण पोहण्यासाठी धरणाजवळ गेले होते. यामध्ये निहाल व सीरक्षीत पाण्यात बुडाले होते.

खोपोली नजीक द्रुतगतीवर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती पौड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस नाईक रविंद्र नागटिळक आणि लवासा लाइफ गार्ड विजयकुमार कांबळे, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे, विजय शिवतारे आणि त्यांच्या पथकाने तब्बल १९  तास शोध मोहीम राबविली. त्यामुळे आज सकाळी दोघांचे मृतदेह मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला सापडले. घटनास्थळी हजर राहून पौड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनीही मृतदेह शोधमोहिमेत सहभाग घेतला.  
       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापाचा वाद पोरावर राग! रिक्षातून ओढून धुणे धुतल्यासारखं ४ वर्षीय मुलाला मारहाण, मुंबईतील अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ...

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रॉडकास्ट इंजिनियरचा मृत्यू; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Satara News: सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप अनावर, महिन्याभरात दुसरी घटना, नेमकं काय घडलं!

Fridge Safety Tips : फ्रीजचा ब्लास्ट! उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 4 चुका; नाहीतर बॉम्बसारखा फुटेल रेफ्रिजरेटर

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT