The death of 23 depositors of DSK Scheme 
पुणे

डीएसकेंच्या 23 ठेवीदारांचा मृत्यू

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे : ठेवींवर चांगला परतावा मिळतोय म्हणून आयुष्याची पुंजी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतविणारे ठेवीदार आता आपले पैसे मिळावे म्हणून जिवाचा आकांत करीत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, राज्यभरातील सुमारे 23 ठेवीदारांचा गेल्या दोन वर्षांत विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्यांच्या नावांची यादीच ठेवीदारांच्या संघटनेमधील प्रतिनिधींनी तयार केली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी काही ठेवीदार या प्रकरणांच्या सुनावणीवेळी न्यायालयातदेखील हजर राहत होते. तर आजारपण, मुला-मुलींचे लग्न, घराचे बांधकाम अशा विविध कारणांसाठी त्वरित पैसे मिळावेत म्हणून अनेकांची न्यायालयीन लढाई सुरूच आहे. या प्रकरणात डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई, मेव्हणी यांच्यासह काही नातेवाईक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यातून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. तर, मुख्य आरोपींसह इतरांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. डीएसके यांनी 35 हजार गुंतवणूकदार आणि बॅंकांची सुमारे 3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

म्हातारपणी न्यायालयाची पायरी 
डीएसके यांच्याकडे गुंतवणूक केलेल्यांमध्ये सर्वसामान्यांपासून व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि नोकरदारांचा समावेश आहे. अनेक वर्षे चांगला परतावा मिळत गेल्याने यातील अनेकांनी आपले सर्व पैसे केवळ डीएसके यांच्याकडे गुंतविले होते. मात्र, डीएसके यांच्या अटकेनंतर या सर्वांना मोठा धक्का बसला असून, उतारवयात कोणतीही चूक नसताना आपल्या हक्काच्या पैशांसाठी न्यायालयाची पायरी चढण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.

पैसे न मिळाल्याने आत्महत्या
मुलीच्या लग्नासाठी डीएसकेंकडे गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने तानाजी गणपत कोरके (वय 60) यांनी जानेवारीमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी डीएसके यांना जबाबदार ठरविले आहे. कोरके यांनी मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपये डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतविले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हे प्रकरण लवकर निकाली लागून पैसे मिळावेत, अशी आमची इच्छा आहे. गुंतवणूकदारांमध्ये 75 टक्‍क्‍यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. काही ठेवीदारांकडे आता आजारपणालादेखील पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या 23 ठेवीदारांची माहिती आमच्याकडे आहे. हा आकडा जास्तही असू शकतो.
- ठेवीदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • सुमारे 23 ठेवीदारांचा मृत्यू
  • डीएसकेंना जबाबदार ठरवत एकाची आत्महत्या
  • आत्तापर्यंत 13 जणांना अटक
  • 35 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
  • फसवणुकीचा आकडा तीन हजार कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT