Death of a disabled man crushed under a car in Pune
Death of a disabled man crushed under a car in Pune 
पुणे

पुण्यात कारखाली चिरडून अपंग तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मंदिरासमोर लावलेली कार पार्कींगमधून बाहेर काढत असताना अपंग व्यक्ती कारखाली येऊन चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना चंदननगर येथे मंगळवारी दुपारी पावणे एक वाजता घडली. याप्रकरणी कार चालकास चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन सुरेश पिटेकर (वय 20, रा.आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या अपंग व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईच्या एकाला अटक केली असून, पोलिस अजून त्याची चौकशी करत असल्याचे समजते.

मनसेच्या इंजिनला चावी मिळणार; पुण्यात असणार 'हे' उमेदवार

पोलिस कर्मचारी एल.एस.पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन पिटेकर यांचे आई-वडील मोलमजुरी करतात तर, अर्जुन दोन्ही पायांनी अपंग असल्याने चंदननगर येथील विडी कामगार वसाहतीमध्ये असलेल्या नवग्रह मारुती मंदिरासमोर भाविकांकडे पैसे मागून स्वतःचा उदरनिर्वाह भागवित असे. आरोपी हा खासगी कार चालक असून, तो मंगळवारी दुपारी प्रवाशांना घेऊन नवग्रह मंदिरामध्ये दर्शनासाठी आला होता. प्रवाशांचे दर्शन झाल्यानंतर तो पार्कींगमधून कार बाहेर काढत होता, त्याचवेळी अर्जुन पिटेकर हे कारच्या समोरील बाजुस आल्याचे चालकास दिसले नाही. त्याने कार बाहेर काढल्यानंतर अर्जुन पिटेकर यांच्या अंगावरुन कार गेली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पुणेकरांनो काळजी घ्या; पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT