corona 
पुणे

धक्कादायक, दौंडमध्ये कोरोनाने महिलेचा मृत्यू, तरूणास लागण

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरातील ९० वर्षीय कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीमधील एका ३० वर्षीय तरूणाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ झाली आहे.

दौंड शहरातील दौंड- सिद्धटेक रस्त्यालगतच्या नेहरू चौक येथील एका नव्वद वर्षीय महिलेस २६ मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या १७ जणांचे शहरातील कोविड केअर सेंटर येथे स्वॅब टेस्टसाठी नमुने घेण्यात आले. त्या सर्व १७ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला होता. काल (ता. २९) रात्री या महिलेचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

मूळ अंबरनाथचा रहिवासी असलेला व सध्या कुरकुंभ एमआयडीसीमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीता कामाला असणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणास त्रास होऊ लागला. त्यामुळे दौंड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या तरूणास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज (ता. ३०) प्राप्त झाला आहे, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

३१ दिवसांत ५१ जणांना कोरोनाची बाधा
दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत ५१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ४० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच, एका ७० वर्षीय नागरिकाचा व एक ९० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आजअखेर बाधितांची संख्या ९ झाली असून, त्यामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) ६ पोलिस व ३ नागरिकांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT