The death of a woman who feel Dizzy while following husband in pimpri 
पुणे

'मला तुमच्यासोबत यायचे' म्हणत नवऱ्याचा पाठलाग करणाऱ्या महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नवऱ्याचा पाठलाग करताना चक्कर येवून पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

पुणे : कोथरूडमध्ये वाहतूक कोंडीमुळे रिक्षात जन्मले बाळ

आशा भिमराव जोगदंड (वय 35, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी 7 डिसेंबरला (शनिवार) त्यांच्या घरी बैठक घेतली होती. पतीकडील नातेवाईकही त्यांच्या घरी आले होते. मात्र, बैठकीत व्यवस्थित चर्चा न झाल्याने पती व त्यांचे नातेवाईक तेथून निघाले. दरम्यान, मला तुमच्यासोबत यायचे असल्याचे म्हणत आशा या पतीच्या पाठोपाठ निघाल्या. मात्र, ते थांबले नाहीत. त्यानंतर पिंपरीगावातील त्यांच्या घरापासून शगुन चौकापर्यंत आशा या पतीच्या पाठोपाठ आल्या.

पिंपरीतील घरफोडीत सिंगापूरच्या तीन हजार डॉलरची चोरी 
 

शगुन चौकात आल्या असता त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर काही वेळाने त्यांना पुन्हा रक्ताची उलटी झाली. उपचारासाठी त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी (ता.13) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT