The Deccan Bhide bridge is not yet underwater and available for transport 
पुणे

खडकवासला धरणातून विसर्ग वाढला; भिडे पुलाबाबत महत्त्वाचे अपडेट

सकाळवृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु वाढविण्यात आला आहे. मात्र अद्याप डेक्कन भिडे पुल पाण्याखाली गेलेले नाही. त्यामुळे भिडे पुल व नदीपात्रातील रस्ता अद्याप सुरळीत सुरु आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खडकवासला धरण साखळीमध्ये मागील काही दिवसांपासुन पावसाची संततधार सुरु आहे. त्यातच सोमवारी सकाळपासुन धरणातुन 9 हजार क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर नदीला 16 हजार क्यूसेकपेक्षा जादा पाणी सोडल्यानंतर डेक्कन येथील भिडे पुल पाण्याखाली जात असल्याचे सूत्रांनी सांगितलेदरम्यान खडकवासला 100 टक्के, पानशेत 98 टक्के, वरसगाव 80 टक्के व टेमघर ही धरणे जवळपास तितकेच भरले आहे. त्यातच पावसाचे प्रमाण वाढल्यास पानशेतमधुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे विद्यापीठाने करून दाखविले; कोरोनामुळे सुरक्षितपणे परीक्षा घेण्याचे होते मोठे आव्हान

डेक्कन वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक बोठे म्हणाले, "खडकवासला धरणातून जादा विसर्ग केल्यामुळे शनिवारी रात्री भिडे पुल पाण्याखाली गेला होता, मात्र काही तासातच हे पाणी कमी झाले. त्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु आहे, परंतु अजुन भिडे पुल पाण्याखाली जाण्याची स्थिती नाही. त्यामुळे या पुलावरुन वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु आहे." 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT