Nana Patole Sakal
पुणे

पुणे पालिकेत भाजपकडून बिल्डरांच्या हिताचे निर्णय; नाना पटोले यांचे आरोप

महापालिकेत भाजपने बिल्डरांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्याकडून संगनमताने चार लोकांच्या हितासाठी निर्णय पालिकेत घेतले जात आहेत.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - महापालिकेत भाजपने बिल्डरांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्याकडून संगनमताने चार लोकांच्या हितासाठी निर्णय पालिकेत घेतले जात आहेत. काल तयार केलेल्या रस्त्यावरून आज जम्पिंग करून जावे लागते. असा कारभार पालिकेतील भाजपचा आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पटोले हे वारजे येथे काँग्रेसचे हवेली ब्लॉक अध्यक्ष सचिन बराटे यांच्या घरी आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बराटे यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी सभापती कै.रामभाऊ बराटे यांचे पटोले यांचे चांगले संबध होते बराटे यांच्या परिवारातील माऊली बराटे, बाळासाहेब बराटे, केदार बराटे, आबा जगताप, मोहन कलाटे उपस्थित होते. कोरोनाच्या काळात आमचे मित्र माणिकराव जगताप रामभाऊ बराटे असे मित्र गमावले. पक्षाचे, त्याच्या परिवाराचे, परिसराचे मोठे नुकसान झाले. असे ही त्यांनी भावना व्यक्त केली.

पूर्वी शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केले. हे पुणेकरांना सांगण्याची गरज नाही. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष पुन्हा त्याच जोमाने लोकांपर्यंत जाऊन आशीर्वाद घेऊन पालिकेत सत्तेत येईल. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. यावर बोलताना पटोले म्हणाले, आता त्यांना आपल्या घराची आठवण येत आहे. त्यामुळे भाजपचे घर खाली होणार आहे.

पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पटोले म्हणाले, आम्ही पक्षाची भूमिका एकदा स्पष्ट केली आहे. राजकीय मुद्द्यावर वारंवार चर्चा केली जात नाही. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकित आम्ही काँग्रेसची भूमिका मांडली. त्याला जनतेने प्रतिसाद दिल्याने या पोटनिवडणूकित जनतेने काँग्रेसच्या उमेदवाराना विजयी केल्याने आमचा पक्ष महाविकास आघाडी सरकारमधील नंबर एकचा पक्ष झाला आहे.

महापालिका निवडणुकीत नवीन पिढीला संधी देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तर आवश्यक आहेच. ६० टक्के तरुणांना संधी मिळेल. परंतु उमेदवाराचे विजयी होण्याचे किती मेरिट आहे. ते तपासले जाणार आहे. असे मेरिटचे उमेदवार दिल्याने निकाल देखील चांगला असेल.

नोटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाले त्याबद्दल बोलताना पटोले म्हणाले, पंतप्रधान यांच्यावर देशाच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. नोटांबंदीचा निर्णय पूर्ण अयशस्वी झाला. त्यामुळे देशाची आर्थिक प्रगती कमी झाली. हजारो कुटुंब उध्वस्त झाली. देशातील नागरिकांची आर्थिक थट्टा करणारे हे पहिले भाजपचे पंतप्रधान ठरले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात, ताटे वाजविणे, दिवे लावणे, गो कोरोना असे म्हणायला सांगितले अन यामुळे अंधश्रद्धा भाजपने खतपाणी घातले.

केंद्र सरकारने कोरोनच्या काळात रोगांच्या संदर्भाने दहशत निर्माण केली. या आजाराच्या उपाय योजना राबविल्या नाहीत. ऑक्सिजन, रेमडिसिव्हर अशी औषधे किंमती ७००-८०० रुपयांहून लाख रुपयांपर्यंत पोचल्या. अनेकांचा लोकांचा जीव गेला. काही जणांचे आर्थिक नुकसान झाले. त्याच्यात देशात डिझेल- पेट्रोल दरवाढ करून एक नागरिकांना आर्थिक बरबाद करण्याचे काम केंद्र सरकारने केले.

कृषी कायद्याच्या विरोधात एक वर्षापासून शेतकरी लढत आहे. त्यात काही शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्यांना भेटायला, बोलायला पण पंतप्रधान तयार नाहीत. अन्नदात्याचा कसला राग पंतप्रधान व भाजपला आला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे,ऍड अभय छाजेड, श्रीकृष्ण बराटे, सचिन साठे, कैलास कदम, विठ्ठल पाटील, सोनाली मारणे, लहू निवंगुणे, अवधूत मते, सुरेश मते, किशोर रायकर, वैशाली खाटपे, दत्तात्रय झंजे, बाबा खान, प्रभाकर भोरकडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कॉंग्रेसच्या समर्थनार्थ मतदारांची नावे वगळली- राहुल गांधीचा गंभीर आरोप

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT