Decision in two days regarding Dehu, Alandi Palkhi ceremony 
पुणे

वारकरी बांधवांनो, देहू-आळंदी पालखी सोहळ्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय 

सकाळवृत्तसेवा

पुणे : देहू, आळंदी पालखी सोहळ्याचे नियोजन आणि त्याचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

आणखी वाचा- पुण्यात सिंहगड रस्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित बैठकीत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...

जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम :
'सोशल डिस्टन्सिंग’ बाबत नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती, संभाव्य स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण पाहता दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात येईल. सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!
सरकारकडून आवश्यक सुविधा अपेक्षित : 
देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे म्हणाले, ''आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळ्यासाठी गरजेच्या आवश्यक सुविधा सरकारकडून अपेक्षित आहेत. आम्ही समाजाच्या आरोग्याची काळजी घेत नियमावलीचे पालन करून पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवू.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT