lockdown Sakal Media
पुणे

कडक लाॅकडाउनमुळे मुळशीतील रुग्णसंखेत घट

दहा दिवसांच्या कडक लाॅकडाउनचा चांगला परिणाम.

सकाळ वृत्तसेवा

कोळवण : मुळशी तालुक्याच्या पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पूर्व भागातील मोठ्या गावात कोरोना बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे होते. याच धर्तीवर १५ मे ते २५ दरम्यान दहा दिवस कडक लाँकडाऊन पाळण्याचा निर्णय पिरंगूट येथे झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला होता, याचा परिणाम पाहता रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. दि. १५ मे, दि. १६ मे व १७ मे रोजी अनुक्रमे २००, ३०१, ९८ नविन रुग्ण सापडले तर ४०४, ८१८, ८५८ अॅक्टीव रुग्ण होते. आठवड्याभरानंतर दि. २२ मे, दि. २३ मे व २४मे रोजी अनुक्रमे १४७, ६६, ७८ नविन रुग्ण सापडले तर ३४४, ३४५, ३४८ अॅक्टीव रुग्ण होते. या वरुण ही रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसते.

मुळशीतील पुर्व पट्ट्यातील पिरंगूट, भुगाव, कासारआंबोली, उरवडे, पौड, घोटावडे, भरे,अंबडवेट, लवळे, नांदे, भुकूम या गावांमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. या गावांत दररोज सापडणाऱ्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होती. मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावांच्या लोकप्रतिनीधींनी कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्याने रुग्णसंखेत घट झाली. आज ७८ नविन रुग्णांचीलभर पडली असुन आजअखेर १७१५९ रुग्ण सापडले. यांतील १६६०९ रुग्ण बरे झाले आहेत. आजअखेर २०२ रुग्णांचा मृत्यू झालेला असुन ३४८ अॅक्टीव रुग्ण आहेत.

लाॅकडाऊनमध्ये नागरीकांनी सहकार्य केल्याने रुग्णांच्या संख्येत घट झाली. यापुढे लाॅकडाऊन शिथील झाले तरी लोकांनी मास्कचा वापर करुन सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.

-अजित कारंजकर(आरोग्य अधिकारी, मुळशी)

बाहेर कामाला जाणाऱ्यानी डबल मास्क वापरणे तसेच घरातील सदस्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. दहा दिवस सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व पोलिस यंत्रणा यांनी एकत्रित येऊन काम केले परिणामी रुग्णांचा वाढता आलेख कमी झाला. तरीसुद्धा नागरीकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये.

-अशोक धुमाळ (पोलिस निरिक्षक, पौड पोलिस स्टेशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT