pune sakal
पुणे

बारामती : रुग्णालयाच्या आवारात उभारलेले १०० खाटांच्या क्षमतेचे मोड्युलर रुग्णालय.

अत्याधुनिक व मॉड्युलर स्वरूपातील १०० खाट असलेल्या रुग्णालयाचे बारामतीत लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

बारामती : अत्याधुनिक व मॉड्युलर Sophisticated and modular स्वरूपातील १०० खाटांची क्षमता Bed capacity असलेल्या अभिनव रुग्णालयाचे बारामतीत लोकार्पण Dedication of Abhinav Hospital at Baramati होणार आहे. संपूर्णपणे प्री फॅब्रिकेटेड Prefabricated स्वरूपाचे हे अशा प्रकारचे पहिलेच रुग्णालय Hospital आहे. दोन आयसीयू ICU व सात आयसोलेशन वॉर्डात मिळून १०० रुग्णांची सोय करता येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. या वेळी मास्टरकार्ड प्रशासन संपर्क प्रमुख आर. बी. संतोषकुमार, अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे संचालक मॅथ्यु जोसेफ, मास्टकार्डचे संचालक निशांत गुप्ता, सीमा व्यास, विनय अय्यर, डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित राहणार आहे.

रुई ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालय उभारण्यात आले आहे. मास्टरकार्ड कंपनीच्या अर्थसहाय्याने व अमेरिका-इंडिया फाउंडेशनच्या सहकार्यातून या हॉस्पिटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात केली आहे. मास्टरकार्डमार्फत भारतात अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात बारामतीसह अमरावती व जालना या तीन ठिकाणी प्रत्येकी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यादृष्टीने पेटीएमच्या वतीने येथे ऑक्सिजन प्लँटची निर्मिती केली आहे. हे रुग्णालय साधारणत: ३० हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये तपासणी व निरीक्षण कक्ष, डॉक्टर कक्ष, अलगीकरण कक्ष हे चार विभाग आहेत.

या सुविधाही असणार

९२ विलगीकरण खाटा, ८ अत्याधुनिक अतिदक्षता खाटा, सेंट्रल आॅक्सिजन, आयसीयूमध्ये एन.आय.व्ही., विलगीकरण कक्षामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मल्टिपॅरा मॉनिटर, ऑक्सिजन मेनिफोल्ड व ड्युरा सिलेंडर, चार पाण्याच्या टाक्या

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT