सावरकर मार्गाखालून वाहणाऱ्या नाल्याची यंदा सफाई न झाल्याने साचलेला कचरा, थर्मोकोल.
सावरकर मार्गाखालून वाहणाऱ्या नाल्याची यंदा सफाई न झाल्याने साचलेला कचरा, थर्मोकोल. Sakal
पुणे

पावसाळ्याच्या तोंडावर नाला सफाईस दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा

महर्षी नगर - पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका दरवषी लाखो रुपयांचा निधी नालेसफाईसाठी खर्च करत असते, नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी ही नालेसफाई शहरात सगळीकडे केली जाते, जुन्या प्रभाग क्रमांक २८ मधील मुकुंदनगर भागातील अनेक ठिकाणी नाला सफाईला दिरंगाई होत असल्याचे दिसते.

सदर नाला बिबवेवाडी मार्गे ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर, महर्षी नगर, मुकुंद नगर मधून जातो, यामध्ये झाडी झुडपी वाढली असून थर्मोकोलचे तुकडे, विनावापर गादी, कपड्याचे ढीग अडथळे ठरू शकतात. पहिल्याच पावसात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी महर्षी नगर चाळीतील अनेक घरांत नाल्यातील पाणी गेले होते.

नाल्याच्या सफाईची आवश्यकता आहे. नालेसफाई करण्या संदर्भातील पत्र महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले आहे. मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केल्यावरही प्रतिसाद मिळत नाही. गेल्या वर्षी अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. नालेसफाई योग्यरित्या व्हायला हवी- प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक नाल्याचा प्रवाह मार्केटयार्ड, महर्षि नगर, प्रेमनगर, मुकुंदनगर, शंकरशेठ रस्ता या भागातून जातो. सफाई संदर्भात महानगरपालिका मलनिस्सारण विभागाचे अभियंता दीपक सोनवणे यांना संपर्क केला असता ते म्हणाले महर्षीनगर, मार्केट यार्ड च्या नाले सफाईला सुरुवात केली असून इतर राहिलेली नालेसफाई करून घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT