मार्केट यार्ड (पुणे) : चिकनमुळे कोरोनाची बाधा होते, असा गैरसमज समाज माध्यमांवर पसरविण्यात आला होता. त्यामुळे शहरासह राज्यातच चिकनची दुकाने बंद करण्याची वेळ आली होती. मात्र, आता हा गैरसमज दूर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहरात ग्राहकांकडून चिकनला प्रचंड मागणी होत आहे. रोज 175 ते 200 टनाची विक्री होत आहे. मागणीच्या तुलनेत अद्यापही आवक होत नसल्याने दर तेजीत आहेत. सध्या चिकन रुपये किलो विकले जात आहे.
जानेवारी महिन्यात समाजमाध्यमांवर चिकनविषयी गैरसमज पसरविण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ग्राहकांची संख्या 10 टक्क्यांवर आली होती. त्यामुळे शहरातील अनेक चिकन विक्रेत्यांना दुकाने बंद करावी लागली. पोल्ट्री चालकांना कवडीमोल किमतीत कोंबड्या विकाव्या लागल्या. काही पोल्ट्री चालकांनी कोंबड्या फेकून दिल्या. मात्र अनेक तज्ज्ञांनी चिकनमुळे कोरोना होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे खवय्यांचा चिकनविषयीचा गैरसमज दूर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा चिकनला मागणी वाढली आहे.
लॉकडाउनमुळे अनेक ग्राहकांना घराबाहेर पडता येत नाही. तसेच, पोल्ट्रीफॉर्मवरून कोंबड्यांची शहरात वाहतूक करण्यात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे शहरात कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. मालाच्या तुटवड्यामुळेच अद्यापही शहरातील चिकनची सुमारे 50 टक्के दुकाने बंदच असल्याचे व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत ग्राहकांची संख्या 10 टक्क्यावरून 60 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. लॉकडाउन उठल्यानंतर मात्र चिकनचा व्यवसाय पूर्ववत होईल. वाहतूक पूर्णत: सुरू झाल्यास पोल्ट्रीतून कोंबड्यांची आवक वाढेल. येत्या काळात ग्राहकांची संख्या वाढतच जाणार आहे. त्यामुळे वाढलेले दर काही काळ टिकून राहणार असल्याचा अंदाजही परदेशी यांनी व्यक्त केला.
शहरातील चिकनचे किलोचे दर
चिकन ः 240 रुपये
जिवंत ः 180 रुपये
बोनलेस ः 350 रुपये
लेगपीस ः 270 रुपये
दररोज 150 ते 200 टन विक्री
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात इतर वेळी सोमवार ते शुक्रवार 300 ते 400 टन चिकनची विक्री होत असते. तर शनिवार आणि रविवारी मात्र चिकनची विक्री 400 ते 5500 टनापर्यंत जात असते. मात्र, सद्य:स्थितीत लॉकडाउन असल्याने दररोज 150 ते 200 टनाची विक्री होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.