Demand of the Federation of Traders to start business in the morning
Demand of the Federation of Traders to start business in the morning 
पुणे

भोरमधील व्यवसाय सुरु करण्याची व्यापारी महासंघाची मागणी  

विजय जाधव

भोर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे शहरातील व्यावसाय काही अटीं व शर्थींवर पुन्हा सुरु करावेत, अशी मागणी भोर व्यापारी महासंघाकडून करण्यात आली. व्यापारी महासंघाच्यावतीने बंडूशेठ गुजराथी यांनी आमदार संग्राम थोपटे यांना निवेदन दिले असून त्याच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस ठाण्यास देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे शहरातील व्यवसाय बंद असून सर्व उलाढाल थांबलेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक घडी पूर्ववत आणण्यासाठी व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे. लाइट बिले. जीएसटी, इनकम टॅक्स, बँकांचे हप्ते आणि कामगारांचा पगार आदीमुळे व्यापा-यांना व्यवसाय सुरु केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी प्रशासनाने ठराविक वेळ निश्चित करून आम्हास व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे बंडूशेठ गुजराथी यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक व्यापारी ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्कशिवाय ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सोशल डिस्टंसींगचे पालन करून दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. अशा प्रकारच्या अटींचे पालन व्यापाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. याबाबत आमदार संग्राम थोपटे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील  व नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात काय निर्णय घेतील याकडे भोरवासियांचे लक्ष लागले आहे.

कोण म्हणते गुटख्याला बंदी? या ठिकाणी होते खुलेआम विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT