baramati.jpg 
पुणे

बारामती शहरातील दुकानदार म्हणतात...

मिलिंद संगई

बारामती : गेल्या 33 दिवसांपासून बारामती शहरात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नसल्याने बारामतीतील कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हावेत व व्यापारपेठ पूर्ववत सुरु करावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

दरम्यान, बारामतीत 14 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्या नंतर बारामती शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसह बारामती पॅटर्न मुळे बारामतीतील कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळाल्याचे आता सिध्द झाले आहे. 

बारामतीत शिथीलता दिल्यानंतर आता बाहेरून बारामतीत येणा-यांचे प्रमाण वेगाने वाढू लागल्याने प्रशासनात अस्वस्थता आहे. असे असले तरी आता व्यापारचक्र अधिक वेगाने फिरणे गरजेचे असल्याने बारामतीत या आठवड्यात दोन दिवसांऐवजी चार दिवस व संध्याकाळी सहा ऐवजी रात्री आठपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी व्यापा-यांची मागणी आहे. 

जवळपास दोन महिने लॉकडाऊनमुळे व्यापार ठप्प झाला होता, त्या मुळे बाजारपेठ सुरु झाल्यानंतर खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती, दोनच दिवस तेही संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार असल्याने गर्दी वाढली. दुकाने सुरु राहण्याचा कालावधी चार दिवसांचा व वेळ आठपर्यंत केल्यास गर्दीचे विभाजन होऊन दुकानदारांचीही सोय होईल, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. 

दैनंदिन व्यवहार जोपर्यंत सुरळीत सुरु होत नाहीत, तो पर्यंत बारामतीच्या अर्थकारणाला गती येणार नाही, त्या मुळे आता या आठवड्यापासून चार दिवस व रात्री आठ पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास प्रशासनाने मान्यता द्यावी अशी व्यापा-यांची मागणी आहे. जास्त दिवस व वेळ दुकाने सुरु राहीली तर लोक त्यांच्या सवडीनुसार येऊन खरेदी करतील व ठराविक वेळेतील गर्दीचा ताणही कमी होईल, असे व्यापा-यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT