Department of Health guidelines on how to protect doctors and staff treating corona disease
Department of Health guidelines on how to protect doctors and staff treating corona disease 
पुणे

Corona Virus : डॉक्टर कोरोनाग्रस्तांवर उपचार करतायेत, पण त्यांची सुरक्षा?

सकाळवृत्तसेवा

पुणे : एक डॉक्‍टर शेकडो कोरोना बाधितांना वाचवू शकतो, पण तोच डॉक्‍टर आजारी पडला तर. कल्पनाच नको. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्यक्ष कोविड-19शी दोन हात करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सुरक्षा कशी असावी, त्यासंबंधी आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशासन काय याचा घेतलेला आढावा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैद्यकीय कर्मचारी महत्त्वाचे का? 
- कोरोना बाधितांशी प्रत्यक्ष संपर्कामुळे संसर्गाचा सर्वाधिक धोका 
- रुग्णांच्या वाढत्या संख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुरेशा डॉक्‍टरांची संख्या गरजेची 
- दुर्लक्षामुळे कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची घटती संख्या धोकादायक 
- संसर्ग झाल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 14 दिवस विलगीकरणात रहावे लागते, अशा कालावधीत हे धोकादायक 
- कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्‍टरच आपले सैनिक 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे: 
केंद्र सरकारच्यावतीने डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि व्यवस्थापन सुनिश्‍चित करण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. 

1) कर्मचारी व्यवस्थापन: 
- प्रत्यक्ष कोविड-19 च्या संपर्कातील वैद्यकीय कर्मचारी आणि इतर सुविधा पुरविणारे स्वयंसेवक यांची विभागणी करत कार्यनिश्‍चिती करावी 
- राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा गट (ग्रुप 4) व्यवस्थापना संदर्भात राज्यांना मार्गदर्शन करेल. संबंधित कर्मचाऱ्यांचा डेटाबेस तयार करावा 
- निवासी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा रुग्णालय व्यवस्थापनासाठी वापर व्हावा 

2) आरोग्य सुरक्षा 
- भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्विनचा रोगप्रतिबंधक औषध म्हणून लक्षण दिसणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वापरण्याची सूचना 
- केंद्राच्या वतीने वैयक्तिक संरक्षण उपकरणांचा (पीपीई) आणि एन-95 मास्क पुरवठा राज्यांना करण्यात येणार 
- लक्षण दिसल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तातडीने कोविड चाचणी करावी 
- कोविड रेड क्‍लस्टरच्या व्यवस्थापनासाठी उच्च स्तरीय तज्ज्ञांची समिती पुरवणार 

3) मानसिक व्यवस्थापन 
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मार्गदर्शन पुरविण्यात येणार 
- त्यासाठी 08046110007 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. 
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ताणतणावाचे व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात यावे 


Coronavirus : पुण्यातून कोरोनाचा होऊ शकतो नायनाट; पण...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी हे कराच... 
1) प्रत्यक्ष कामावरील सुरक्षा: 
- पीपीई कीट, वैद्यकीय साहित्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे योग्य वितरण आणि पुरवठा 
- कोविड रुग्णाचा प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी उपकरणांचे आणि उपचाराचे डिजीटलायझेशन 

2) अधिकचा तान कमी करा: 
- शहरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संख्या, वेळ आणि कौशल्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यांच्यावरील ताणतणावाचे व्यवस्थापन करावे. 
- कर्मचाऱ्याला सुविधेबरोबरच त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना (उदा. बालसंगोपन आणि वृद्धांसाठी केअरटेकर) 

3) मनोबल वाढवा: 
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी निगडित कोणत्याही समस्येचे तातडीने निराकरण गरजेचे 
- त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समाजातील मान्यवरांसह सामान्यांनी पुढाकार घ्यावा 
- रुग्णालयातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे संरक्षण करा 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


आकडे बोलतात.. 
1) केंद्र सरकारच्या वतीने 20 एप्रिलपर्यंत पुरवण्यात आलेली साहित्य 
- वैयक्तिक संरक्षण साहित्य (पीपीई): 5.11 लाख 
- एन-95 मास्क: 30.32 लाख 

2) राज्यांकडे आधी उपलब्ध साठा: 
- पीपीई किट: 2.75 लाख 
- एन-95 मास्क: 16.67 लाख 
 
3) आरोग्य विमा: 
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 22.12 लाख वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाखाचे विमा संरक्षण. प्रिमीयम सरकार भरणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT