Ajit Pawar
Ajit Pawar Google file photo
पुणे

अजित पवारांचा एक फोन आणि काही तासात औषधे रुग्णापर्यंत!

मिलिंद संगई, बारामती

एका रुग्णाला ही औषधे मिळावी यासाठी खुद्द उपमुख्यमंत्र्यांपासून ते डॉ. लहाने, सुनीलकुमार मुसळे, सुरेशसिंग गौड, अशोक केदार आणि निशांत कसबे या सर्वांनी जे एकत्रित प्रयत्न केले, त्यामुळे त्या रुग्णाला त्याचा उपयोग झाला.

बारामती : स्थळ बारामतीतील विद्या प्रतिष्ठान. (Vidya Pratishthan Baramati) शनिवार (ता.8) सकाळची वेळ. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अभ्यागतांना भेटत होते. एक युवक अत्यंत तणावात तावातावाने उपमुख्यमंत्र्यांशी बोलू लागला.

माझ्यावर 15 लाखांचे कर्ज झालंय, वडिलांच्या डोळ्यावर उपचार करायचे, पण आता पैसेच नाहीत, माझ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही... हे बोलताना त्याचे डोळे पाणावले होते... आम्ही दोघे भाऊ शिकत काम करुन उदरनिर्वाह करतोय, गेले 23 दिवस झाले वडिलांसाठी आम्ही संघर्ष करतोय पण यश येत नाही... पैशांअभावी वडिलांचा एक डोळा अगोदरच गेलेला आहे, आता दुसरा डोळा वाचविणे गरजेचे आहे, दोन दिवसांपूर्वी वडिलांना डिस्चार्ज देणार होते पण बिल भरता येत नसल्याने त्यांना हॉस्पिटल सोडेना. (Deputy CM Ajit Pawar helped needy patient for medicines)

ही कैफियत ऐकल्यानंतर स्वत: अजित पवारही काहीसे भावुक झाले. त्यांनी तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना फोन लावायला सांगितला. उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. लहाने यांना या युवकाला हवी असलेली औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्यानंतर डॉ. लहाने यांनीही ही औषधे काही वेळातच उपलब्ध केली.

त्या नंतरची अडचण होती ती औषधे मुंबईत आणि त्या युवकाचे वडील पुण्यात दवाखान्यात दाखल होते. सुनीलकुमार मुसळे यांनी मुंबईतील पोलिस कर्मचारी अशोक केदार यांची मदत घेण्याचे ठरविले. केदार मोटारसायकलवरुन जे.जे. रुग्णालयात गेले, दोन बॉक्स मोटारसायकलवर बसत नव्हते, शेवटी त्यांनी त्या औषधांच्या बॉक्ससाठी टॅक्सी केली. टॅक्सीत औषधे आणि मोटारसायकलवर कसबे असा व्हीटी स्टेशनकडे प्रवास सुरु झाला. मुंबईतून रेल्वेने पुण्यापर्यंत औषधे नेण्याची जबाबदारी पुणे लोहमार्गचे पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी स्वीकारली. त्यांनी निशांत कसबे यांना पुण्याहून मुंबईला ही औषधे आणण्यासाठी पाठविले.

इकडे मुंबईत दोन बॉक्स व्यवस्थित नेता येणार नाही, म्हणून केदार यांनी क्रॉफर्ड मार्केटमधून नवीन बॉक्स घेतले आणि त्यात व्यवस्थित औषधांचे पॅकिंग केले आणि ते व्हीटीला आले, तेथे पुणे रेल्वे पोलिस दलातील निशांत कसबे हे वाटच पाहत होते. केदार यांनी कसबे यांना हे औषधांचे बॉक्स दिले. कसबे ही औषधे घेऊन थेट संबंधित रुग्णालयात पोहोचले.

अजित पवार यांच्या फोननंतर अवघ्या काही तासात मुंबईतून ही औषधे संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली. एका रुग्णाला ही औषधे मिळावी यासाठी खुद्द उपमुख्यमंत्र्यांपासून ते डॉ. लहाने, सुनीलकुमार मुसळे, सुरेशसिंग गौड, अशोक केदार आणि निशांत कसबे या सर्वांनी जे एकत्रित प्रयत्न केले, त्यामुळे त्या रुग्णाला त्याचा उपयोग झाला. वैद्यकीय विषयात अजित पवार किती संवेदनशील आहेत, याचीच प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT