Ajit_Pawar 
पुणे

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भामा-आसखेड धरणातून पाण्याचा कोटा मंजूर केल्यामुळे खडकवासला साखळी धरणातून शहराला होत असलेल्या पाणी कोट्यात कपात करण्याच्या हालचाली जलसंपदा विभागाने सुरू केल्या आहेत. त्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुक्रवारी (ता.१) जाहीर कार्यक्रमात दिली. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सर्व संबंधितांनी एकत्रित बोलून त्यासंदर्भात बैठक घेऊ, असे आश्‍वासन पवार यांनी दिले. 

महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाला. भामा-आसखेड धरणातून पुण्यातला पाणी कोटा मंजूर झाल्यामुळे खडकवासला साखळी धरणातून शहराला होणाऱ्या पाणी कोट्यात कपात करण्यात यावी, यासाठी जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु शहराची वाढती लोक संख्या आणि नव्याने समाविष्ट झालेली 23 गावे यांचा विचार करता हा निर्णय घेऊ नये, अशी मागणी महापौर मुरली मोहोळ यांनी विनंती केली. 

तोच धागा पकडून पुणे शहराचा आमदार म्हणून मी देखील दादा ही विनंती करतो की शहराच्या पाणी कोट्यात कपात करू नये, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महापौर आणि पाटील यांच्या उभे भाषणासाठी पवार उभे राहिले. खडकवासला धरणसाखळीतून पुणे शहरासाठी असलेल्या पाणी कोट्यात कपात करण्यासंदभार्त जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझी भेट घेतल्याची कबुली दिली.

पवार म्हणाले, "शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे भामा आसखेड मधून पाणी आणावे लागले. जलसंपदाची लोकं भेटली. भामा-आसखेड योजना सुरू झाले की खडकवासालाचे 2 टीएमसी पाणी शेतीला दिल्यास त्यातून एक आवर्तन होईल, असे सांगत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका झाल्या की याबाबत एकत्रित बैठक घेऊन यातून मार्ग काढू.'' यावरून पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात पुन्हा एकदा कपात करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT