Gram_Panchayat_ElectioN 
पुणे

निवडणूक ग्रामपंचायतीची अन् पंचक्रोशीत चर्चा रंगली आजीबाईंची!

सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी (पुणे) : पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात शुक्रवारी (ता.१५) ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान संपन्न होताना नव मतदारांत पहिल्याच मतदानाचा उत्साह दिसून येत होता.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातही हाच उत्साह दिसत होता. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत झालेल्या मतदानात नागरिकांनी  उत्साहात सहभाग घेत आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जुन्नर तालुक्यातील काटेडे या गावी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत एकूण तीन प्रभागील सात जागांसाठी मतदान होणार होते, परंतु यात तीन जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने उरलेल्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 

निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी चर्चा मात्र रंगली ती ८७ वर्षीय आजीबाईंची. चंद्रभागा कोंडाजी चिलप यांनी अंथरुणाला खिळल्या असतानाही आपली मतदान करण्याची इच्छा त्यांचे पुत्र ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रय चिलप यांच्याकडे व्यक्त केली. आपल्या आईच्या इच्छेला मान देत दत्तात्रय यांनी आईला खुर्चीवर बसवून वाहनातून मतदान केंद्रावर नेलं आणि तेथे आजीबाईंनी हसतहसत मतदान केले. आणि त्यांना पुन्हा घरी सुखरूप आणले. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून ते माझ्या आईने अंथरुणाला खिळले असतानाही पार पाडल्याचा एक वेगळाच आनंद मला होत आहे, अशी भावना दत्तात्रय यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

विशेष म्हणजे या आजीबाईंची नात दीक्षिता चिलप या आजी अंथरुणाला खिळल्याचे समजताच सुट्टीवर आलेल्या आहेत. त्या पुणे येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत असून त्यांनीही मतदाराचे कर्तव्य पार पाडले. आजीबाईंनी अशा परिस्थितीतही मतदान केल्याचे कळताच ग्रामस्थांनी आजीबाईंच्या या निर्णयाचं कौतुक केलं. कर्तव्यावर हजर असलेले पोलिस कर्मचारी आणि मतदान केंद्रातील अधिकारी-कर्मचारी यांनीही आजीबाईंच्या या इच्छेचं कौतुक करीत मतदान न करणाऱ्यांसाठी आजींनी एक आगळावेगळा पायंडा घालून दिला आहे, असं म्हटलं आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT