Development of Pimpri-Chinchwad during the NCP regime and Corruption in BJP era said Deputy Chief Minister Ajit Pawar
Development of Pimpri-Chinchwad during the NCP regime and Corruption in BJP era said Deputy Chief Minister Ajit Pawar 
पुणे

अजित पवारांनी साधला भाजपवर पिंपरीमध्ये थेट निशाणा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शहर संघटना सध्या ढेपाळली आहे. त्यातून बाहेर निघा आणि महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा विकास झाला. मात्र, खोट्या आरोपांमुळे पराभव झाला आणि सत्तेवर आलेल्या भाजपने महापालिकेत भ्रष्टाचार सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त अजित पवार चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "पिंपरी-चिंचवड महापालिकेत आपली अनेक वर्षे सत्ता होती. या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी अनेक विकास कामे केली. आजचा शहराचा विकास दिसतो, तो राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच झाला आहे. सत्तेचा दुरुपोयोग कधीच केला नाही. मात्र, भाजपने बदललेली वॉर्डरचना आणि विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत आपल्याला पराभव पत्कारावा लागला. महापालिकेची सत्ता भाजपकडे गेली. मात्र, महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपच्या काळात अनेक गैरव्यवहार सुरू आहेत. तो जनतेसमोर मांडायचा आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने फारसे बोलता येणार नाही. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर आयुक्तांना विकास कामांबाबत विचारणा करणार आहे.'' 

सोने, हिरे-मोत्याचे दागिने, दीडशे डॉलर अन् अकरा लाख; कर्वेनगरमधून चोरट्यानं लंपास केलं हो!​

पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न अधून-मधून डोके वर काढत असतो. गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली जात आहे. तलवारी हातात घेऊन दहशत माजवली जात आहे. हाणामारी व लुटमारीच्या घटना घडत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करायला हवा. बंदोबस्त करतानासुद्धा पोलिसांचा आदरपुर्वक दबदबा निर्माण झाला पाहिजे.

शहरात कायदा व सुव्यवस्था राखत असताना पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, त्यात राजकीय हस्तक्षेप होत असतो. अशा कारवाईच्या वेळी पोलिसांच्या कामात किंवा कायदा सुयव्यस्था राखताना राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. शहरातीलच नव्हे तर, आपापाल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य कारवाई करायला हवी, अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT