dhankwadi.jpg 
पुणे

पुण्यातील बॅंड वादकांसाठी ढोल- ताशा संघाने...

सकाळवृत्तसेवा

धनकवडी (पुणे) : पुणे बॅंड कला विकास प्रतिष्ठानअंतर्गत असलेल्या 225 बॅंड वादकांना ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे धान्य व मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच, लॉकडाउनमध्ये गरजूंची मदत केलेल्या 19 सामाजिक संस्था आणि मंडळांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. "फेसबुक लाइव्ह' द्वारे कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान देवदासी भगिनींनादेखील 100 किलो तांदूळ देण्यात आला. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसराई गेली आणि पुढे काय?, हा प्रश्न आम्हा बँड वादक व चालकांसमोर उभा राहिला. काहीसा दुर्लक्षित होत असलेला बँड, त्यातील कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यात दिलासादायक बाब म्हणजे गणेशोत्सवात पुण्यासह महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे ढोल-ताशा वादक आमच्या व्यथा समजून घेत आमच्या मागे उभे राहिले आहेत. वादकांच्या मागे वादक उभा राहणे ही पहिलीच घटना आहे, असे मत प्रख्यात बँड वादक व प्रभात बँडचे अमोद सोलापूरकर यांनी व्यक्त केले. 

आनंद सराफ म्हणाले, ढोल-ताशा पथके वादनातून संस्कृतीचा जागर करतात. त्यासोबतच पथकांकडून खूप मोठया प्रमाणात सामाजिक व चांगले उपक्रम होतात. ते उपक्रम समाजासमोर यायला हवे. केवळ ढोल-ताशा वादनामुळे होणारा त्रास समोर येतो. मात्र, त्यांनी केलेले समाजोपयोगी उपक्रम येत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम, बँड प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन ववले, ओंकार आढाव, बाळासाहेब आढाव, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संघटक अनुप साठये, सचिव संजय सातपुते, शिरीष थिटे, विलास शिगवण, केतन देशपांडे, अतुल बेहरे, प्रकाश राऊत, ओंकार कळढोणकर, आशुतोष देशपांडे आदी सहभागी झाले होते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

SCROLL FOR NEXT