Crime 
पुणे

खंडणी प्रकरणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षींची होणार चौकशी; आरोपीकडून आणखी 10 लाख जप्त!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डॉक्‍टरकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांची आता अमली पदार्थ व खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मनोज अडसूळ याच्याकडून पोलिसांनी आणखी दहा लाख रुपये जप्त केले. 

खंडणी प्रकरणाशी अनेकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचा जबाब नोंदविणार आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे, याची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्‍यता आहे.

पोलिसांनी अडसूळ याच्याकडून खंडणीच्या प्रकरणातील ५ लाख रुपये गुरुवारी जप्त केले होते. तर शुक्रवारी (ता.२८) आणखी १० लाख रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले. याबरोबरच अडसूळची वेगवेगळ्या बॅंकांमध्ये असणारी बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत.

संबंधित खात्यावरून कोणत्या प्रकारचे व कोणाशी आर्थिक व्यवहार झाले आहेत, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT