Crime 
पुणे

Breaking : पुण्यात दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये राडा; ऑफिस दिलं पेटवून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्थिक कारणावरुन बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद होऊन एकाने भागीदाराच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत कार्यालयाची जाळपोळ केली. तसेच स्वत: पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता.२४) दुपारी अडीच वाजता धनकवडी येथे घडली. 

भरत मीठालाल नागोरी (वय 61, रा. गंगा ईशान्य सोसायटी, शंकर महाराज मठाजवळ, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन हसमुख बाबूलाल जैन (रा. ईशा पैलेस, गुलटेकडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, जैन आणि अन्य भागीदारानी 2006 मध्ये ईशा ग्रुप नावाची भागीदारी कंपनी सुरु केली होती. त्यामध्ये फिर्यादी, जैन आणि स्वर्णसिंग सोहल हे 2014 पासून संचालक होते. 2014 मध्ये जैन याने ईशा ग्रुप कंपनीमधील ईशा स्ट्रक्चर्स कंपनीतील राजीनामा दिला. त्यानंतर भागीदाराचा वाद न्यायालयात गेला. 

फिर्यादीचे आणि जैनचे पूर्वीचे आर्थिक व्यवहार आणि अन्य कारणासाठी वाद सुरु होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी जैन फिर्यादीच्या शंकर महाराज मठाजवळच्या गंगा नक्षत्र प्रकल्पमधील कार्यालयात गेला. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन बाहेर काढले. कार्यालय आतून बंद करुन कार्यालयाची तोडफोड केली. तसेच तेथेच आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT