road11.jpg 
पुणे

पुणे- नाशिक महामार्गाच्या 'त्या' बाह्यवळण रस्त्याचा वाद चिघळला; शेतकरी आक्रमक

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : पुणे- नाशिक महामार्गाच्या सुरू असलेल्या बाह्यवळण रस्त्यावर पाटे खैरे मळा येथील जुना पारगाव रस्त्यावर नियोजित मंजूर आराखड्या नुसार चौक करावा. या ठिकाणी भुयारी मार्ग करू नये, अशी मागणी येथील बाधित सुमारे शंभर शेतकऱ्यांनी केली आहे. येथील बाह्यवळण रस्त्यावर चौक की भुयारी मार्ग असावा यावरून येथील शेतकऱ्यांच्या दोन गटातील वाद विकोपाला गेला असून बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे- नाशिक महामार्गाला सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा बाह्यवळण रस्ता काढण्यात आला आहे. रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंजूर आराखड्या नुसार बाह्यवळण रस्ता क्रॉस करून जाणाऱ्या खोडद रस्ता व पाटे खैरे मळा येथील जुन्या पारगाव रस्त्यावर चौक करण्यात येणार आहे. मात्र, या ठिकाणी चौक केल्यास शेतमाल वाहतूक करणे शक्य होणार नाही. अपघाताचा धोका आहे. या मुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करावा अशी मागणी काही शेतकरी व खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती पाहता भुयारी मार्ग करणे शक्य नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांचे मत आहे.

मागिल दीड वर्ष ठप्प असलेले काम आता सुरू झाले आहे. बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पाटे खैरे मळा येथील जुना पारगाव रस्त्यावर भुयारी मार्ग करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नामदेव खैरे यांच्या नेतृत्वाखालील काही शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले आहे. यामुळे बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपदीत झालेले या भागांतील बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाह्यवळ रस्त्याचे काम मंजूर आराखड्या नुसार चौक करून तातडीने पूर्ण करावे. भुयारी मार्ग करू नये या मागणीसाठी बाधित शेतकरी राजेंद्र शेटे, शिवाजी पाटे यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेण्यात आली.

या वेळी  संजय खैरे, सुरेश पाटे, दशरथ शेटे, विलास खैरे, पवन पाटे, प्रदिप पाटे यांच्यासह सुमारे शंभर शेतकरी उपस्थित होते. राजेंद्र शेटे म्हणाले, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे. येथील बाह्यवळण रस्ता ओढ्यालगत असल्याने भौगोलिक परिस्थिती पाहता भुयारी मार्ग करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भुयारी मार्ग केल्यास पुन्हा भूसंपादन करावे लागणार आहे. पुन्हा भूसंपादन करण्यास बाधित शेतकऱ्यांचा विरोध आहे. या वेळी भुयारी मार्गाची मागणी करणारे नामदेव खैरे यांचा शेटे, सुरेश पाटे यांनी निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill : वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT