Ujani Dam Sakal Media
पुणे

Video : उजनीच्या पाण्यावरून शेतकरी भिडले; सिंचनभवनात गोंधळ

उजनीच्या पाण्यावरून राजकारण केलं जात आहे. झालेले गैरसमज दूर करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सोलापूरच्या प्रतिनिधींच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

उजनीच्या पाण्यावरून राजकारण केलं जात आहे. झालेले गैरसमज दूर करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सोलापूरच्या प्रतिनिधींच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

पुणे : उजनी धरणातील (Ujani Dam) ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्यावरून गेल्या काही दिवसांपासून इंदापूर-सोलापूरकरांमध्ये खडाजंगी सुरू आहे. सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी उजनीतील पाणी पळविल्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी (ता.१०) सिंचन भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी इंदापूर आणि सोलापूरचे शेतकरी (Farmers) अधिकाऱ्यांसमोरच भिडले. (Disputes between farmers of Indapur and Solapur over distribution of water from Ujani dam)

सोलापूरच्या वाट्याचे एक थेंबही पाणी घेणार नाही, पण इंदापूरलाही पाणी कमी पडू देणार नाही, अशी आमदार भरणे यांची आग्रही भूमिका होती. उजनीच्या पाण्यावरून राजकारण केलं जात आहे. झालेले गैरसमज दूर करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सोलापूरच्या प्रतिनिधींच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली आहेत. तसेच उजनी धरणाचे पाणी इंदापूरला जाणार नाही, असेही सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी कागदपत्रे सादर करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांच्या शंकांचे निरसन अजून झालेले दिसत नाही, अशी माहिती भरणेंनी दिली.

भरणे पुढे म्हणाले की, सोलापूरचे पाणी कमी होणार नाही आणि इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. दहा महिन्यात सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवू. सोलापूरच्या प्रतिनिधीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणखी एक-दोन मीटिंग घेऊन प्रश्न सोडवू, पण कृपा करून यामध्ये राजकारण करू नये. पुणे शहराची पाण्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे इंदापूरला मिळणारे पाणी कमी झाले आहे.

भरणेंच्या भूमिकेवर सोलापूर पाणी संघर्ष समितीचे अतुल खोपसे म्हणाले की, दत्तात्रय भरणेंनी जे सांगितले ते सर्व खोटे आहे. आमच्यावर अधिकारी आणि पोलिसांचा मोठा दबाव आहे. उजनीच्या वाटपातील एक टीएमसी पाणीसुद्धा कुणाला मिळणार नाही. हे सगळं बारामतीवरून घडलं आहे. आमचे पाणी चोरलं असून सगळी गोलमाल उत्तरं दिली जात आहेत. भरणेंनी इंदापूर आणि सोलापूरच्या लोकांमध्ये भांडणं लावली आहेत. यापुढील आंदोलन आम्ही गोविंद बागेत करणार आहोत.

दुसरीकडे इंदापूर तालुक्यातूनही अनेक नेते आणि शेतकरी या ठिकाणी आले होते. खडकवासला धरण साखळीतील पाणी उजनीतून इंदापूरला आणलं जाणार आहे. ही सगळी योजना जुनी असून सोलापूरचे पाणी पळवलं जात असल्याचा त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ते राजकारण करत असल्याचे दिसून येते. पुणे शहराची पाण्याची मागणी वाढल्याने इंदापूरला मिळणारे पाणी कमी झाले आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्ही मागतोय, ते द्यायला सरकार तयार आहे, असे प्रदीप गारटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT