wagholi1.jpg 
पुणे

वाघोलीत तब्बल `एवढ्या` गरजू कुटुंबांना...

सकाळवृत्तसेवा

वाघोली : वाघेश्वर तरुण मंडळाचा 61 वा वर्धापनदिन व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व बांधकाम मजूर कुटुंबांना 5000 किट धान्याचे वाटप करण्यात आले. ज्यांच्या कडे शिधा पत्रिका नाही व ज्यांचे नाव जिल्हा परिषद शरद भोजन योजनेत समाविष्ट नाही अशा गरीब व मजूर कुटुंबांना हे धान्याचे किट वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालया शेजारील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सामाजिक अंतर ठेवत वाटप करण्यात आले. गर्दी होऊ नये यासाठी सहा वॉर्ड साठी सहा दिवस देण्यात आले होते. त्या दिवशी त्या वॉर्डातील नागरिकांनी हे धान्य किट स्वीकारले. यामध्ये गहू व तांदुळाचा समावेश होता. शिधा पत्रिका धारकांना त्यावरील धान्य मिळाले तर जिल्हा परिषद शरद भोजन योजनेत अनेकांना धान्य मिळाले. मात्र मजुरांची व गरीब कुटुंबांची संख्या जास्त असल्याने व त्यांना कोणत्याच योजनेत धान्य मिळाले नसल्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामपंचायत, नागरिक, व्यापारी यांनी दररोज सुमारे 10 ते 12 हजार नागरिकांना जेवणही पुरवले. गावी जाण्यापूर्वी अनेक परप्रांतीयांना याचा लाभ मिळाला. वाघोलीत अनेक ग्रहकुल सोसाट्या आहेत. त्यामुळे घर काम करणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे. मात्र लॉकडाउन सुरू झाले अन त्यांच्याही कामांना ब्रेक लागला. यामुळे त्यांची आर्थिक घडी पूर्ण विस्कटली. बांधकाम साईटवरही मजुरांची संख्या हजारोत होती. त्यांच्या हाताला ही काम नसल्याने त्यांचेही हाल सुरु झाले होते. यासर्वांनाच याकाळात मदतीचे अनेक हात पुढे आले. धान्य वाटप प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, तरुण मंडळाचे सदस्य, नागरिक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT