Pune-Stranded-Students 
पुणे

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; बसने घरी सोडणार तेही मोफत!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लाॅकडाऊनमध्ये पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अखेर घरी जाण्यासाठी थेट जिल्हा प्रशासनानेच मदत करण्याचा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत खासगी बसने त्यांच्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे. यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेचे सहकार्य घेतले जात आहे. 

गेल्या ५४ दिवसांपासून पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी एकट्याने खोलीत रहात आहेत. त्यांना गावाकडे जायची परवानगी मिळावी, सरकारने बसची सुविधा करावी अशी मागणी विद्यार्थी करत होते. सरकार 'कोटा', 'दिल्ली'तील विद्यार्थी महाराष्ट्रात आणत आहे, पण पुण्यातील मुलांसाठी काहीच होत नाही यावर संताप व्यक्त करत होते. या विद्यार्थ्यांना मदत म्हणून काही विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी मोफत बस उपलब्ध करून दिली. पण सरकारने काहीच निर्णय घेतला नाही.

आता ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन असणार आहे, त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून हे विद्यार्थी घरी पाठविले जावेत यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.  विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नैसर्गिक आपत्ती निधीतून या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत उपजिल्हाधिकारी मीता शिंदे म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यासाठी बसची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. यासाठी नैसर्गिक आपत्तीचा निधी वापरला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने गुगल फाॅम मध्ये माहिती भरून घेतली होती. त्यातील विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांना गावाकडे पाठविले जात आहे. आज सोलपूर व यवतमाळसाठी प्रत्येकी एक बस सोडली आहे." 

महेश बडे म्हणाले, "विद्यार्थ्यांना घरी जाता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यासाठी बसची सोय केली जाईल. यासाठी जिल्हा प्रशासनास मदत करणार आहोत." अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 9158278484, 8484086061 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा नाही
पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनामुळे घरी जाता येणार आहे. पण पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही. जे विद्यार्थी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर राहत आहेत, त्यांनाच गावाकडे जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजू सॅमसनने इतिहास रचला, १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा जगातला पहिला खेळाडू

Lagnanantar Hoilach Prem : विंटेज कार, पारंपरिक गाणी आणि चाहत्यांची गर्दी; स्टार प्रवाह मालिकेचा लग्न ट्रॅक कलाकारांसाठी ठरला ऐतिहासिक

Latest Marathi News Live Update : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत वायू गळती, पोलीस तपास सुरु

Ladki Bahin Yojana: जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर, लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५००? महिलांमध्ये नाराजी

Malegaon News : वीज कंपनीचा हलगर्जीपणा की तांत्रिक बिघाड?; उच्चदाब वाहिनीमुळे माती आणि खडक वितळले

SCROLL FOR NEXT