Sunstroke
Sunstroke Salal
पुणे

असा करा उष्माघाताला प्रतिबंध

सकाळ वृत्तसेवा

राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे, त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वेगाने वाढण्याचा धोका आहे. उष्माघाताला निश्चितपणे प्रतिबंध करता येतो.

पुणे - राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण झाली आहे, त्यामुळे उष्माघाताचे (Sunstroke) प्रमाण वेगाने वाढण्याचा धोका (Danger) आहे. उष्माघाताला निश्चितपणे प्रतिबंध (Restrictions) करता येतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले.

कसा होतो उष्माघात?

  • उन्हाळ्यामध्ये शेतात किंवा मजुरीची कामे फार वेळ करणे

  • कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे

  • जास्त तापमान असलेल्या खोलीत सतत काम करणे

  • भर उन्हात घट्ट कपड्यांचा वापर करणे

कोणती आहेत लक्षणे?

  • थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे

  • चक्कर येणे, डोके दुखणे

  • रक्तदाब वाढणे, अस्वस्थता व बेशुद्ध पडणे

कोणते आहेत प्राथमिक उपचार?

  • रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे

  • खोलीत पंखे, कुलर सुरू करावेत

  • रुग्णाच्या शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा

  • रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी

  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात

हे करा

  • वारंवार पाणी प्यावे

  • सच्छिद्र सुती कपडे वापरावे

  • घराबाहेर पडताना गॉगल, छत्री किंवा टोपी, बूट व चपलांचा वापर करावा

  • प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी

  • उन्हात काम करणाऱ्यांनी ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास मीठ-साखर-पाणी घ्यावे

हे करू नका

  • लहान मुलांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका

  • दुपारी १२.०० ते ३.३० या वेळेत बाहेर जाणे टाळा

  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा

  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा

  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT