पुणे

रॅपिड व आरटीपीसीआरच्या भिन्न रिपोर्टमुळे बारामतीत होतोय डॉक्टरांना मनस्ताप

मिलिंद संगई

बारामती : शहरातील काही खासगी प्रयोगशाळेत कोरोना रॅपिड अँटीजेन पॉझिटीव्ह आल्यानंतर शासकीय आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह येत असल्याने अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. या मध्ये खाजगी प्रयोगशाळा चालक डॉक्टरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात येथील प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन व्होरा म्हणाले, कोवीड चे निदान  रॅपिड अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी करून होते. अँटीजेन चे रिपोर्ट तीन तासात मिळतात. अँटीजेन पॉझिटीव्ह आल्यानंत आरटीपीसीआर करायची गरजच नसते. अँटीजेन टेस्ट  निगेटिव्ह आली व संशय जास्त असेल तर खात्री करण्यासाठी आरटीपीसीआर  केली जाते.  आरटीपीसीआर च्या रिपोर्टला 24 तास लागतात.

दोन्ही टेस्ट निगेटिव्ह असतील व शंका दाट असेल तर चेस्ट सीटी स्कॅन करावा लागतो. अँटीजेन व आरटीपीसीआरची सेन्सिटीव्हीटी 60 ते 70 टक्के असते.  याचा अर्थ कोवीड असून सुद्धा 20 ते 30 टक्के रुग्णांमध्ये टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. सँम्पल कसे घेतले, आजाराच्या कोणत्या टप्प्यावर घेतले यावर सुद्धा रिपोर्ट अवलंबून असतो. त्यामुळे माझा रिपोर्ट एका ठिकाणी पॉझिटीव्ह व दुसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह असा गैरसमज होतो पॉझिटीव्ह हा रिपोर्ट हा पाँझिटीव्हच असतो. (फाल्स पॉझिटीव्ह ची शक्यता एक टक्क्यांपेक्षाही  कमी असते.)

आपल्याला ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, जुलाब असेल अथवा वास व चव नसेल तर टेस्ट करणे गरजेचे आहे. कोणत्याही शंका असतील तर आपल्या डॉक्टरांचा कोरोनाच्या साथीचा धोका अजूनही टळलेला नसून नागरिकांनी कमालीची काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन व्होरा यांनी केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT