Gym_Fitness 
पुणे

व्यायाम करताना मास्क घालायचा की नाही? स्थानिक डॉक्‍टर म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाउननंतर दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. थंडीची चाहूल लागल्याने नागरिकही आता मॉर्निक वॉक आणि व्यायामासाठी बाहेर पडत आहेत. शारीरिक हालचाली करताना घट्ट मास्क घातल्यामुळे श्‍वसनाला त्रास होऊ शकतो, म्हणून जागतिक आरोग्य संघटनेसह डॉक्‍टरांनीही अशावेळी मास्क घालताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य बनले आहे. परंतु काही अपवादात्मक स्थितीत मास्कचा मर्यादित स्वरूपात वापर करणे गरजेचे आहे. व्यायाम करताना सहा फुटाच्या आत कोणी नसल्यास मास्क नाही घातला तरी चालेल. फुप्फुसांशी आणि हृदयाशी निगडित आजार असलेल्या रुग्णांनी सहा फुटाचे अंतर ठेवून मास्क न लावता व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच, घरात व्यायाम करताना मास्क न घालणेच योग्य आहे. पुढील काही महिने तरी सार्वजनिक ठिकाणी व्यायाम करणे टाळण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. व्यायाम करताना वापरलेला मास्क रोज धुणे आणि त्याची स्वच्छता नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. 

लहान मुलांची घ्या विशेष काळजी :
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पाच वर्षांपुढील मुलांनी बाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य आहे. खेळताना किंवा सायकलिंग करताना लहान मुलांनी सैल मास्क घालावा. शक्‍यतो सहा फुटाचे अंतर ठेवूनच व्यायाम केला तर मास्क घालण्याची गरजही पडणार नाही, असा सल्ला डॉ. अविनाश इनामदार यांनी दिला आहे. लहान मुलांना खेळताना किंवा व्यायाम करताना मोठाले श्‍वास घ्यायला लावावे, असेही ते म्हणाले. 

व्यायाम करताना ही घ्या काळजी :
- बाहेर मॉर्निंग वॉक किंवा व्यायामाला जाताना चांगल्या दर्जाचा सैल असलेला मास्क घाला. 
- सहा फुटाच्या आत कोणी नसल्यास मास्क नाही घातला तरी चालेल. 
- खेळताना किंवा गटाने व्यायाम करताना चांगल्या दर्जाचा मास्क घालावा. 
- हृदय आणि फुप्फुसाशी निगडित आजार असलेल्या लोकांनी रोजची औषधे, स्प्रे, वाफ घेणे गरजेचे 
- सहा फुटाचे अंतर ठेवूनच व्यायाम करा. 
- सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांनी शक्‍यतो एकटाच व्यायाम करावा. 
- व्यायाम करताना मोठ्याने श्‍वास घ्या, जेणेकरून शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी कमी होणार नाही. 

एकत्र व्यायाम करत असाल आणि मॉर्निंग वॉकला जात असाल, तर उत्तम दर्जाचा सैल मास्क घालणे कधीही चांगलेच. परंतु, सहा फुटाच्या अंतराच्या आत कोणी नसेल तर मास्क टाळला तरी चालेल. अशा वेळी पुरेसा श्‍वास घेण्यासह त्यावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. 
- डॉ. अविनाश इनामदार, हृदयरोग तज्ज्ञ.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT