फक्त माणुसकी! कोविड सेंटरमध्ये चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा sakal
पुणे

फक्त माणुसकी! कोविड सेंटरमध्ये चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा

पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

सकाळ वृत्तसेवा

येरवडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरमध्ये १ वर्षांचा राजू (नाव बदलले आहे) कोरोनाचा (corona) संसर्ग नसताना उपचार घेणाऱ्या आई-वडिलांसह राहत आहे. घरी सांभाळण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्याला रुग्णालयात राहावे लागत आहे. कोरोनाचे (corona) सर्वनियम पाळून रविवारी (ता.८) त्याचा पहिला वाढदिवस रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यामुळे पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉक्टर, परिचारिकांनी घडविलेल्या माणुसकीच्या दर्शनाने ते भारावून गेले. (doctors nurses created humanity pune)

खासगी कंपनीत काम करणारे राजूचे वडील सोलापूरचे तर त्याचे आजोळ पुण्यातील. मात्र, लॉकडाउनमध्ये त्यांची नोकरी गेली. बेरोजगाराचे संकटसमोर असतानाच त्याच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ते उपचारासाठी पुण्यात आले.

पुण्यात आल्यानंतर राजू वर्षाचा असल्यामुळे तो कोणाकडे राहण्यास तयार नव्हता. त्यामुळे तो पालकांसोबतच येरवड्यातील कोविड केअर सेंटरमध्ये नाईलाजास्तव राहात आहे. रुग्णालयातील प्रशस्त खोल्या, खेळण्यासाठी भरपूर खेळणी त्यामुळे राजू येथे चांगलाच रमला. त्याचा रविवारी पहिलाच वाढदिवस होता. तो कसा साजरा करायचा या चिंतेत पालक होते. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, हाऊस किपिंगच्या कर्मचाऱ्यांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी डॉ. निहारिका बुध्दीसागर, आरती काळे, प्रिया गजभिये, अक्षय खाडे, निलम कोकणे, सागर मोहिते, लक्ष्मी आल्हाट, सुषमा पवार, विशाल धुतडमल, वनिता लांडगे उपस्थित होते. बाळाचा वाढदिवस लांबून पाहणाऱ्या त्याच्या पालकांना आनंदाश्रू आवरात आले नाही.

राजूला आवडते तिखट जेवण

कोविड केअर सेंटरमध्ये लहान मुलांसाठी सकस आहार दिला जातो. मात्र, गावाकडे राहणाऱ्या राजूला हे जेवण सुरुवातीला आवडले नाही. बोबड्या बोलात त्याने तिखट जेवणाची मागणी करताच कर्मचाऱ्यांनी ते त्यास उपलब्ध करून दिले. त्यानंतर तो आनंदाने जेवू लागल्याचे येथील पर्यवेक्षक युवराज खंडागळे यांनी सांगितले.

बाळाचा वाढदिवस आहे हे कळल्यावर सर्व परिचारिका आणि डॉक्टरांनी वाढदिवस साजरा केला. घरी असल्यासारखेच वाटले. मुलाचा पहिला वाढदिवस विस्मरणीय आहे. आम्ही आजारी आहोत, हे क्षणभर विसरून गेलो.

- राजूचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT