Doctors in the state staged agitation by becoming self quarantine 
पुणे

आंदोलनाचा हटके अंदाज; राज्यातील डॉक्टर झाले 'सेल्फ क्वारंटाइन'

सकाळवृत्तसेवा

पुणे  : डॉक्टरांनीसुध्दा आता सामुदायिक रित्या 'सेल्फ क्वारंटाइन' करून घेण्याची वेळ आली आहे. या विलगीकरणाची मुदत १४ दिवसांपर्यंत असू शकेल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) राज्य शाखेने सरकारला दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपचाराचे दर ठरविण्याच्या रुग्णालयांच्या आधिकारावर सरकार अतिक्रमण केलं जातंय. तसेच, डॉक्टरांच्या संबंधीतील अनेक न्याय्य मागण्यांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केलंय या विरोधात आता आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलायं. त्या आंदोलनाची ही सुरवात येत्या बुधवारपासून (ता. 9) होत आहे, अशी माहिती आयएमएच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि राज्य मानद सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिली. 

कोव्हिड रुग्णाच्या उपचारात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांना मूक श्रद्धांजली वाहून बुधवारी सकाळी ११ वाजता आंदोलनाची सुरवात होईल. सर्व डॉक्टर आपापल्या दवाखान्यासमोर, एकत्रित होऊन दहा मिनिटे ही मूक श्रद्धांजली वाहतील. आयएमए शाखेसमोर अथवा गावातील प्रमुख ठिकाणी शहीद डॉक्टरांचे प्रातिनिधिक पोस्टर लावून आणि त्याच्या खाली प्रत्येक आयएमए सदस्य पणती किंवा मेणबत्ती लावून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. या आंदोलनाची तीव्रता गुरुवारी (ता. 10) वाढविण्यात येईल. त्या दिवशी मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करतील, असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले. 

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​  
 

महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर कोव्हिड रुग्णांची सेवा करत आहेत. यामध्ये दीडशेहून अधिक डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. असंख्य डॉक्टरांना कोरोना झाला आहे. अथक परिश्रम केलेले सर्व डॉक्टर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देत आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांच्या मागण्यांकेड सरकार दुर्लक्ष करत आहे. रुग्णालयातील उपचाराचे दर निश्चितीचा निर्णय एकतर्फी घेतला आहे. याचा आयएमएची राज्य शाखा तीव्र निषेध करीत आहे. राज्याच्या २१६ शाखांमधील ४५ हजार डॉक्टर विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे.

'एमपीएससी'ची परीक्षा आता तरी नक्की होणार का ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT