Pune-Stranded-Students 
पुणे

'विद्यार्थ्यांनो गावाकडे जाऊ नका!' पुणे पोलिस सहआयुक्तांनी का केले असे आवाहन?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''पुणे रेड झोनमध्ये आहे, तुमच्या माध्यमातून कोरोना गावाकडे शकतो. त्यामुळे तुम्ही इथेच राहा, अभ्यास करा. तुम्ही भविष्यातील प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्ही पोलिसांप्रमाणे धोके पत्करुन लढल्यास तुम्हाला पुढील आयुष्यसाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल,'' असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी गावाकडे निघालेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी वर्गाला केले आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर राज्यात आणि परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी देण्यात आली. पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी ही त्यांच्या गावी परतू लागले होते. मात्र विद्यार्थी, नागरिक गावाला गेल्याने गावांमधील कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर पोलिस सहआयुक्त डॉ. शिसवे यांनी शहरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गाशी व्हिडिओद्वारे संवाद साधला. "अनेक विद्यार्थी शहर सोडून गेले, तर अनेकजण अजूनही शहरात तग धरुन आहेत. सध्या प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण त्यावर मात करू शकतो.

पुणे रेड झोनमध्ये आहे, तुम्ही गावाकडे कोरोना घेऊन जाऊ नका, इथेच राहा, अभ्यास करा. तुम्ही भविष्यातील प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्ही पोलिसांप्रमाणे धोके पत्करुन लढल्यास तुम्हाला नक्कीच ऊर्जा मिळेल." 

विद्यार्थी वर्गाने शहरातच राहावे, त्यांना कुठलीही अडचण आल्यास आम्ही त्यांना सहकार्य करू. शहराचा पोलिस सहआयुक्त म्हणून, तुमचा मित्र किंवा थोरला भाऊ या नात्याने विद्यार्थी वर्गाला आवाहन करतो, त्यांनी शहर सोडू नये, असेही आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War Impact: 'Strait of Hormuz' म्हणजे काय? भारतासाठी इतका महत्त्वाचा का? हा मार्ग बंद झाला तर महाग होईल तुमचं जेवण!

Gautam Gambhir: ते दोन चौकार त्याने लगावले नसते तर संजूच्या ९७ धावांची चर्चाच झाली नसती! गंभीरने भलत्याच खेळाडूचं केलं कौतुक, Video Viral

शिवसेनेच्या शहरप्रमुखावर धारधार शस्त्रांनी हल्ला; वाहनाचीही तोडफोड, थोडक्यात वाचला जीव, चौघांना अटक...

Latest Marathi News Live Update : नागपूर कारखान्यातील स्फोट : जोपर्यंत युनिट बंद राहील, तोपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळत राहतील -बावनकुळे

Sangli ZP: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १८ मार्चला; सत्ता स्थापनेचा पेच कायम : राजकीय हालचाली गतिमान

SCROLL FOR NEXT