Lockdown
Lockdown 
पुणे

विद्यार्थी म्हणतात लॉकडाउन नको रे बाबा!

सकाळवृत्तसेवा

पुणे - शाळा महाविद्यालये केव्हा सुरू होणार, परीक्षा ऑनलाइन होणार का, ऑफलाइन हेही अद्याप निश्चित झालेले नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपच्या समस्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता लॉकडाउनचा विचार करीत आहे. लॉकडाउन झाला तर, शैक्षणिक अनिश्चितता आणखी वाढेल आणि त्याचा फटका बसेल, असा बहुसंख्य विद्यार्थ्यांचा सूर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडॉउन न करता जनजीवन सुरळीत राहील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेच अनेक विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

संचित काळूसकर - लॉकडाउन करण्यापेक्षा जर मंदिरे, थिएटर, मॉल्स यासारख्या जागांवर निर्बंध घातले तर कदाचित कोरोनाची स्थिती आटोक्यात येऊ शकते. तसेच अनावश्यक जमावबंदी हा देखील एक यावरील एक उत्तम उपाय आहे. पुढे येणाऱ्या कडक लॉकडाउनपेक्षा या गोष्टींचे पालन करणे तुलनेने सोपे होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सालस वाईकर - कडक लॉकडाउन झाल्यास गरजेच्या वस्तूंचा पुरवठा कमी होईल. लॉकडाउनमुळे विद्यार्थी अगोदरच निष्क्रिय झाले आहेत, पुन्हा असं झालं तर शिक्षणाबद्दलची उरली सुरली ओढ आणि असणारा उत्साह नाहीसा होईल. भविष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मागे पडेल. आता कुठे सर्वजण नव्या आशेने कामाला लागले होते पुन्हा मानसिक तणावातून जाण्याची कोणाचीच इच्छा नाही. त्यामुळे लॉकडाउन नकोच.

सानिका कुलकर्णी - लॉकडाउनचा परिणाम जसा उद्योगधंद्यावर होणार तसाच शिक्षणावरही होणार आहे. शाळेत नुकत्याच सुरु झाल्या असताना परत बंद कराव्या लागल्या आहेत. आपण जर नियमांचे पालन केले, स्वतःची काळजी नीट घेतली तर लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही.

अनिष पुरोहित - सर्वांत आधी कोरोनाची सद्यःस्थिती जनतेसमोर यायला हवी. कारण एकीकडे लसीकरण चालू आहे तर दुसरीकडे संपूर्ण लॉकडाउन करण्याची चर्चा चालू आहे. जर जनतेकडून नियम पाळण्याची अपेक्षा असेल तर त्यांच्यापर्यंत योग्य ती परिस्थिती येणे अत्यंत गरजेचे आहे.

आधी कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. त्यात अजूनही ऑनलाइन का ऑफलाइनचा घोळ चालू आहे. यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा.
- अनिकेत देवुगणे

लॉकडउनमुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये न जाता घरूनच ऑनलाइन अभ्यास करावा लागत आहे. यामुळे मोबाईल, लॅपटॉपचा वापर अतिशय वाढला आहे. तसेच परत कडक लॉकडउन झाल्यास किराणा माल, हॉटेल्स, दुकाने बंद झाल्यास सर्व व्यावसायिक वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. 
- श्रिया किंकर

...तर शिक्षणाचा खेळखंडोबा होईल
कोरोनात कसे वागायचे हे लोकांना कळले आहे, सुविधा उपलब्ध  झाल्या आहेत, तरीही कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउन करून शाळा- महाविद्यालये बंद केले तर शिक्षणाचा खेळखंडोबा होणार आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे दिवसभरात दोन, तीन बॅचमध्ये शिक्षण देता आले तरी चालेल; पण लॉकडाउन नको, अशी भूमिका शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाच्या वाढीमुळे २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता १४ मार्चपर्यंत सर्व संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून आणखी निर्बंध आणण्याचा प्रयत्न आहे; पण याचे दूरगामी परिणाम विद्यार्थी, प्राध्यापकांना भोगावा लागणार आहे.

कोरोनाबद्दल लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. उपचाराची तयारी आहे, लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे नुकसान झाले आहे; पण आणखी नुकसान होऊ नये. सावधगिरी बाळगून महाविद्यालयांमधील थेट शिक्षण सुरू ठेवता येईल. शासनाने फक्त इच्छाशक्ती दाखविणे गरजेचे आहे.
- ॲड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शि. प्र. मंडळी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT