Sadanand_More 
पुणे

भाषांचा उपयोग वर्चस्ववादासाठी नको : डॉ. सदानंद मोरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाषांमध्ये सौहार्द असले पाहिजे; पण त्यांचा उपयोग वर्चस्ववादासाठी करणे गैर आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. 

संजय सोनवणी लिखित “प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास” या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, 'सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार, हरी नरके, इंद्रकुमार छाजेड, निलेश नवलाखा, शैलेश पगारिया, नितीन मेमाणे, अरविंद शिंदे, मधुबाला चोरडिया, श्रीमंत कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, "प्राकृत आणि पाली भाषांची स्वतंत्र पुरातन परंपरा आहे. सोनवणी यांनी प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास लिहून भाषिक इतिहासाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली आहे. प्राकृत भाषा अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात आणण्यासाठी आपण पाठ्यपुस्तके लिहून घेतली. विद्यालयांनी त्यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे. प्राकृत भाषांचा इतिहास सर्वांनाच त्या भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल."

पवार म्हणाले, "भाषिक न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न फार जुने आहेत. आर्यवंश सिद्धांत आणि संस्कृत सर्व भाषांची जननी या सिद्ध न झालेल्या सिद्धांतातून, प्रसंगी दिशाभूल करून भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्व माजवण्याचा आजही प्रयत्न होतो. पण भाषिक न्यूनगंडामुळे ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांवर विपरीत मानसिक परिणाम होतो. भाषांचा इतिहास एकतर्फी होता. आता खरे भाषिक वास्तव काय आहे, याचा वेध सोनवणी यांनी या पुस्तकातून घेतला आहे. यामुळे भाषिक न्यूनगंड दूर  होण्यास मदत होईल."

मुथ्था म्हणाले, "अर्धमागधी आणि शौरसेनी प्राकृतच नव्हे; तर आजच्या मराठीचे मूळ असलेल्या महाराष्ट्रीय प्राकृतात प्राचीन कालापासून जैनांनी मोलाची भर घातली, इतकी की तिला जैन महाराष्ट्रीय म्हटले जायचे. या आपल्या पूर्वज प्राचीन भाषेला पुन्हा शिकवणे आणि त्यातील ज्ञान, विज्ञान आजच्या पिढ्यांसमोर आणणे आवश्यक आहे." नरके म्हणाले, की हे पुस्तक मराठी व अन्य प्राकृत भाषांना अभिजात सिद्ध करण्यासाठी मदत करील.

सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी पुढील वर्षी भरवल्या जाणार असलेल्या प्राकृत-पाली विश्व परिषदेची माहिती दिली. संजय सोनवणी मनोगत व्यक्त केले. युवराज शहा यांनी आभार मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT