पुणे

पुणे, पिंपरी परिसरातील ड्रायव्हिंग स्कूलही सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोटार ड्रायव्हिंग स्कूल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्येक मोटारीत एकच उमेदवार आणि एकच प्रशिक्षक असेल, असे बंधन घालण्यात आले आहे.(Driving school in Pune, Pimpri area also started)

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मोटार वाहन प्रशिक्षणाला बंदी घालण्यात आली होती; परंतु निर्बंध शिथिल झाल्यावर आता मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यासाठी पुणे आरटीओने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार, उपाध्यक्ष नीलेश गांगुर्डे, खजिनदार निखिल बोराडे यांनी स्वागत केले आहे. शहरात सुमारे ४०० मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. त्यातील २५० स्कूल सध्या कार्यान्वित आहेत.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी देताना ‘आरटीओ’ने एका मोटारीत एकच उमेदवार आणि प्रशिक्षक असेल, असे बंधन घातले आहे. तसेच प्रत्येक फेरीनंतर मोटार सॅनिटाईज करावे लागेल. तर, प्रशिक्षक आणि उमेदवाराला मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच मोटारीतून फेरी सुरू करण्यासाठी प्रशिक्षक आणि उमेदवाराच्या शरीराच्या तापमानाची चाचणी घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबत घाटोळे म्हणाले, ‘‘मोटार ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी मिळाली, ही स्वागताची बाब आहे. एकाच उमेदवाराला एका फेरीत न्यायचे असल्यामुळे त्यानुसार आम्ही आमचे शेड्यूल तयार केले आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा सराव झाल्यावर त्याला सोडले जाते. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराची फेरी सुरू होते. ‘आरटीओ’ने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे.’’

परवान्यासह शुल्क

शहर ड्रायव्हिंग स्कूलचालक मोटारींच्या प्रकारानुसार सुमारे ६ ते ७ हजार रुपये शुल्क आकारतात. त्यात २४ दिवस उमेदवाराला रोज ४५ ते ६० मिनिटांचा सराव दिला जातो. या शुल्कात शिकाऊ आणि कायमस्वरूपी वाहन चालविण्याच्या परवान्याच्या शुल्काचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT