Balewadi_Accident 
पुणे

मद्यधुंद पोलिस निरीक्षकाने ५ जणांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू तर...

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : एखाद्या चित्रपटातील दृश्‍याप्रमाणे रविवारी (ता.६) भरदुपारी अपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून दुचाकीस्वाराला उडवत १०० मीटर फरफटत नेले. त्यानंतर या भरधाव कारने पंक्‍चरच्या दुकानात घुसून तेथील ३ जणांना उडवून जवळच थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका नागरीकाचा जागीच मृत्यु झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे, तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता बालेवाडीतील ममता चौकात घडली.

संतोष राठोड (वय ३५, रा.काळेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेश सिंग (वय ३७ रा. ताथवडे), आनंद भांडवलकर (वय ३५, बाणेर), दशरथ माने (रा.बाणेर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक एस.डब्ल्यु.निकम यास ताब्यात घेतले आहे. निकम हा सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आहेत.

रविवारी दुपारी एक वाजता तो त्याच्या ताब्यातील कार (एम. एच १४ एच. एस.७६९९) घेऊन बालेवाडी येथील हायस्ट्रीट येथून जात होता. भरपूर मद्यपान केल्याने निकमचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी भरधाव कारने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक बसल्याने त्यावरील दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली एक व्यक्त खाली पडली. मात्र दुचाकी कारमध्ये अडकल्याने कारने दुचाकीस्वाराला १०० मीटर फरफटत नेले. त्यानंतरही कारचा वेग कमी झाला नाही, अखेर निकमच्या ताब्यातील कार ममता चौकात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका पंक्‍चरच्या दुकानामध्ये घुसली. दुकानामध्ये पंक्‍चर काढणारा मुलगा आणि अन्य दोघेजण असे तिघेजण होते. त्यामुळे कारने त्या तिघांनाही उडविले, त्यानंतर जवळच थांबलेल्या टेम्पोला कारची धडक बसली. 

दरम्यान, नागरीकांना काही कळण्याच्या आतच ही घटना घडल्याने पंक्‍चरच्या दुकानातील तिघांना तत्काळ बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ते तिघेदेखील अपघातात जखमी झाले. तर दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासमवेत असणारा दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी निकमला ताब्यात घेऊन जबर चोप दिला. तसेच स्थानिक नागरीकांनी जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव, दत्ता शिंदे आणि पोलिस नाईक बानगुडे यांनी निकमची नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत त्यास ताब्यात घेतले. 

प्रत्यक्षदर्शी म्हणाले... 
''आमच्या डोळ्यांदेखत भरधाव कारने नागरिकांना उडविले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार मद्यधुंद चालकामुळे घडला आहे.''
- रोनक गोटे 

''अपघात घडलेल्या ठिकाणी सातत्याने लहान, मोठे अपघात झालेले आहेत. त्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनानेही घटनास्थळी गतिरोधक बसवून वेगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा.''
- मीना पारगावकर 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT