Maha_Vikas_Aghadi 
पुणे

महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे शिवसेना पडली तोंडावर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरुड येथील एका जागेवर विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे नागरीहिताची ही आरक्षणे उठवू नये, यासाठी शहर शिवसेनेने आंदोलन केले होते. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ती आरक्षणे उठविण्यावर शिक्कामोर्तब केल्याने शहर शिवसेना तोंडावर पडली आहे. 

महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात कोथरुड येथील सर्व्हे क्र. १५९, १६० (भाग) या जागेवर अग्निशामल दल, प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान, दवाखाने आणि प्रसुतिगृह ही आरक्षणे टाकण्यात आली होती. या विकास आराखड्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानेवारी २०१७ मध्ये मंजुरी दिली. मात्र, ही आरक्षणे पानशेत धरणफुटीने मौजे शिवणे गावाच्या विस्थापित झालेल्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या जागेवर टाकण्यात आली होती, त्यामुळे ती उठविण्यात यावी, अशी मागणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे केली होती.

तसेच ही आरक्षणे उठवू नये, यासाठी शहर शिवसेनेने आंदोलन देखील केले होते. तरीदेखील नगरविकास खात्याने जुलै २०१८ मध्ये ही आरक्षणे वगळण्यासाठी हरकती-सूचनांची प्रक्रिया राबविली. त्यावर नगर नियोजन विभागाने मागविलेल्या हरकतींमध्ये कोथरुडकरांनी नागरीहिताची आरक्षणे उठविण्यावर हरकत घेतली होती. मात्र, हरकती-सूचनांची प्रक्रिया करुन राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने ही सर्वच्या सर्व आरक्षणे उठविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यासंबंधीची अधिसूचना राज्य शासनाने नुकतीच काढलेली आहे. त्यामुळे शहर शिवसेना तोंडावर पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT